वाढते वय अन् न मिळणारी नोकरी, पुण्यात एकानं खडकवासल्यात जीव दिला
वाढतं वय आणि बेरोजगारीच्या नैराश्यातून तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
पुणे : वाढतं वय आणि बेरोजगारीच्या नैराश्यातून तरुणाने खडकवासला धरणात (Unemployed Youth Suicide) उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह खडकवासला धरणावरील पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हवेली पोलीस आणि पुणे महानागर पालिकेच्या प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतहेह धरणातून बाहेर काढला. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता खडकवासला धरण परिसरात ही घटना घडली (Unemployed Youth Suicide).
संजय मारुती नाईक (वय 27 ) असं या तरुणाचं नाव आहे. तो मुळचा नागपूरचा होता. तो बेरोजगारीमुळे नैराश्यात होता. त्यामुळे तो 25 जानेवारीला घरातून निघून गेला होता, अशी माहिती संजयचा मोठा भाऊ नरेंद्र नाईकने सांगितलं. नरेंद्रने दोन दिवस संजयचा शोध घेतला. मात्र, संजय कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर नरेंद्रने उत्तम नगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी 28 जानेवारीला दुपारच्या सुमारास खडकवासला धरण शाखेतील स्थापत्य अभियांत्रिकी दत्तत्रय कापसे, कर्मचारी वसंत ठाकर, सागर कडू आणि विष्णू धोंगडे यांनी धरणाच्या भिंतीजवळ मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती कळवली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मल्हारी राऊन यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं आणि संजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यानंतर पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला. उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.
निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या; आत्महत्येचं कारण वाचून हादरालhttps://t.co/lV53kdVvKO#sangali #suicidenews #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2021
Unemployed Youth Suicide
संबंधित बातम्या :
धक्कादायक! मोबाईलमध्ये पाहिला व्हिडीओ अन् संपवलं आयुष्य; कंवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर