पोर्श गाडी बंगळुरमधून पुण्यात कशी आली? देवेंद्र फडणवीसांकडून गाडीबाबत मोठा खुलासा
पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र यावर राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमधील अपघाताची जोरदार चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहून लोकांनीही गाडी चालवत असलेल्या आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. हे प्रकरण दाबलं जात असून आरोपींना वाचवलं जात असल्याची आरोप पोलीस यंत्रणेवर केला जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जात घटनेची माहिती घेत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ही गाडी कुठून आणली गेली? टॅक्स भरला की नाही याबाबत खुलासा केला आहे.
बंगळुरूहुन पोर्श पुण्याला आणली- देवेंद्र फडणवीस
ही बाब सत्य आहे, ही गाडी बंगळुरूमध्ये विकत घेण्यात आली आहे. बंगळुरूहुन पुण्याला आणली, गाडी इकडे आल्यावर मालकांकडे काही कालावधी असतो की त्या काळात आरटीओकडे रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानुसार आता असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरटीओचं इन्स्पेक्शन झालेलं आहे. पण त्यानंतर जो काही टॅक्स भरून नंबर प्लेट घ्यायची असते. मात्र तो भरला गेलेला नाही. त्यासंदर्भात वेगळे काही वॉयलेशन असेल तर त्यासंदर्भात वेगळा एफआयआर दाखल केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
रेसिडेन्शिअल परिसरातील पब्जबाबत धोरण आणणार आहे. त्यांना नियमावली घालणार असून जिथे नियमभंग होतोय ते पब्ज बंद करण्याचे आदेश द्या. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. सीसीटीव्ही लावून चेक करा. पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करणार अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
कोण होता कोण नाही यापेक्षा पोलिसांनी काय केलं हे महत्त्वाचं आहे. पोलिसांनी एफआयआर कधी केला याची वेळ आहे. पोलिसांनी ३०४ लावली. ३०४ ए लावली असती तर सुटले असते. पण पोलिसांनी ते केलं नाही. पोलिसांनी आरोपीचं वय १७ वर्षाचं असल्याचं सांगितलं. त्याला अॅडल्ट ट्रीट करायला सांगितलं. पोलिसांच्या या गोष्टी फर्स्ट अॅक्शन म्हणून झाल्या होत्या. त्यामुळे राजकारण करू नये. आम्हाला हा निकाल धक्कादायका वाटतो. आश्चर्यजनक वाटत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.