Porsche Car Accident : रक्ताच्या नमुन्याबाबत मोठी अपडेट; तपासात दोघांचा कारनामा उघड, पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र
Porsche Car Accident Update : पुण्यातील पोर्श् कार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणात पोलिसांनी तपासानंतर आता आणखी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 19 मे रोजी भरधाव पोर्श कारने अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील कल्याणीनगर अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. यात पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी आरोपींना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न ठळकपणे समोर आल्यावर देशभरातून एकच संताप व्यक्त झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी दोन आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनी रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोघांविरोधात पोलिसांनी 242 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 19 मे रोजी भरधाव पोर्श कारने अभियंता तरुण-तरुणीला जोराची धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
या दोघांविरोधात दोषारोपपत्र
कल्याणीनगर भागातील पोर्श मोटार अपघातप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांविरुद्ध शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात 17 साक्षीदार तपासून 242 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आदित्य अविनाश सूद (वय 52, रा. सोपानबाग, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय 37, रा. बेलवेडर सोसायटी, विमाननगर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
असा केला कारनामा
पोर्श मोटार अपघातात संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कार चालकासोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र होते. या दोघांनी मद्यप्राशन केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली होती. रुग्णालयात तिघांचा रक्त नमुना बदलण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग, ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी संगनमताने रक्ताचे नमुने बदलल्याचे तपासात समोर आले होते.
सूद आणि मित्तल यांचा मोटारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात सक्रिय सहभाग असल्याने या आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे हे दोघे येरवडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अरुणकुमार देवनाथ सिंग याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर तो पोलिसांना शरण आला आहे. याप्रकरणात तपास यंत्रणासह बाल न्याय मंडळ आणि सर्वच यंत्रणांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. माध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर एकच असंतोष उफाळला. त्यानंतर यंत्रणा निमुटपणे कामाला लागल्या.