पुणे: राज्यात आदर्श शाळा म्हणून नाव कमावलेली वाबळेवाडीची (Wablewadi ZP School) शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune ZP )शिक्षण विभागानं कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केलेय.
वाबळेवाडीच्या ज्या शाळेची आणि त्यासाठी दत्तात्रय वारे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्याच दत्तात्रय वारे यांना स्थानिक राजकारणातून निलंबनाला सामोरं जावं लागलंय, असा आरोप शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केलाय. अजित पवारांच्याच ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेकडून दत्तात्रय वारे यांना निलंबित करण्यात आलय.
स्थानिक राजकारणाच्या चिखलातून अशा शिक्षकावर अत्यन्त हास्यास्पद आरोप करून नुकतेच निलंबित करण्यात आले. सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबणाऱ्या या गुरुजींना कामात अनियमितता असा आरोप ठेवून निलंबित केले. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही परंतु ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केले आहे . ही बातमी सुरुवातीला खरी सुद्धा वाटली नाही. विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने या उपक्रमशील शिक्षकाला निलंबित करून तमाम प्रयोगशील शिक्षकांचा अपमान केला आहे अशीच माझी भावना आहे, असं मत शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती अशी या गावची सात वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला होता. मात्र, आता या शाळेला वादांचं ग्रहण लागलंय.
इतर बातम्या:
प्रीतिश देशमुखच्या घरी पोलीस भरतीची हॉल तिकीट; आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर
खूशखबर ! हापूसची पहिली पेटी देवगडमधून रवाना; तब्बल पाच वर्षांनंतर डिसेंबरमध्ये मिळणार आंबा
Pune ZP Education department suspend Wablewadi ZP School Head Master Dattatray Ware for not follow duties