‘आम्ही गुन्हेगार, आम्हाला माफ कर’; पुण्यात झळकले रानगव्याची माफी मागणारे बॅनर

पुण्यात पासोड्या विठोबाजवळील एका दुकानासमोर रानगव्याची प्रतिकृती उभारुन त्याची माफी मागणारे बॅनर झळकले आहे. (punekar apologize bison)

'आम्ही गुन्हेगार, आम्हाला माफ कर'; पुण्यात झळकले रानगव्याची माफी मागणारे बॅनर
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 10:45 PM

पुणे : जंगलाची वाट चुकून पुण्यातील मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, पुणेकरांच्या असंवेदनशीलतेमुळे रानगव्याला आपला जीव गमवावा लगला असे म्हणत, सोशल मीडियावर संतापही व्यक्त होतोय. मात्र, याच पुण्यात पासोड्या विठोबाजवळील एका दुकानासमोर रानगव्याची प्रतिकृती उभारुन त्याची माफी मागणारे बॅनर झळकले आहे. (punekar apologize bison who died in Pune on Wednesday)

भारत फ्लॅग फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी हे बॅनर लावले आहे. मुरुडकर झेंडेवाले म्हणून ते पुण्यात प्रसिद्ध आहेत. मुरुडकर यांनी त्यांच्या दुकानासमोर रानगव्याची प्रतिकृती उभारत रानगव्याच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त केलं. तसेच, त्यांनी ‘आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत’ असे म्हणत, घटनेचे गांभीर्य ओळखून निसर्गात ढवळाढवळ थांंबवण्याचे आवाहन नागरिकांना केले.

पुणेकरांच्या हुल्लडबाजीमुळे रानगव्याचा मृत्यू

बुधवारी (9 डिसेंबर) सकाळी आठच्या सुमारास जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. यातच रानगव्याचा मृत्यू झाला. (punekar apologize bison who died in Pune on Wednesday)

सातशे ते आठशे किलो वजन

हा गवा अत्यंत शक्तिशाली होता. तब्बल 700 ते 800 किलो वजनाचा हा गवा होता. जंगलात राहणारा हा महाकाय प्राणी बुधवारी पुण्यात आल्याने नागरिकांची या गव्याला पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

पुण्यात कोथरुडसारख्या दाटीवाटीच्या भागात रानगवा आढल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. त्याला पाहण्यासाठी पुणेकरांनी या परिसरात मोठी गर्दी केली होती. ही गर्दी बघून रानगवा बिथरला. नंतर वनविभाने या रानगव्याला पकडलं. मात्र, काही वेळांनतर त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्यात रानगवा आढल्याची बातमी काही क्षणांत महाराष्ट्रभर पसरली. सोशल मीडियावर रानगव्याचे काही व्हिडीओही व्हायरल झाले. तर, काही पुणेकरांच्या हुल्लडबाजीमुळे रानगव्याला आपला प्राण गमवावा लागल्याचा आरोप काही प्राणीप्रेमींनी केला.

मात्र, त्यानंतर गुरुवारी (10 डिसेंबर) पुण्यात गव्याची माफी मागणारे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच, त्यांनी रानगव्याची प्रतिकृतीही उभारली आहे.

संबंधित बातम्या :

मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव; पुण्यात सहा तासांचा थरार!

कोथरुडच्या सोसायटीत शिरला रानटी गवा, पुणेकरांची गर्दी

(punekar apologize bison who died in Pune on Wednesday)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.