Pune : पुण्यातील नेहमी तुफान गर्दी होणाऱ्या खडकवासला धरणावर शुकशुकाट…. नेमकं काय कारणं!

| Updated on: Mar 12, 2023 | 10:29 PM

पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरणावर आज रंगपंचमी दिवशी तर तोबा गर्दी असणारच ना? मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल आज रविवार असतानाही एकदम शुकशुकाट पाहायला मिळाला.

Pune : पुण्यातील नेहमी तुफान गर्दी होणाऱ्या खडकवासला धरणावर शुकशुकाट.... नेमकं काय कारणं!
Follow us on

पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यामधील शहराला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण सर्वांना माहित आहे. या धरणावर केव्हाही जा तिथे तुम्हाला कायम पर्यटकांची गर्दी असलेली पाहायला मिळते. धरण पाहायला लोकांना खाण्यासाठी तिथे अनेक खाद्यपदार्थांचे गाडे असतात. मात्र आज रविवारचा दिवस महत्त्वाचं म्हणजे रंगपंचमी दिवशी तर तोबा गर्दी असणारच ना? मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल आज रविवारी एकदम शुकशुकाट पाहायला मिळाला. आज असं काय होतं ज्यामुळे धरणावर अजिबात गर्दी झालेली नव्हती.

नेमकं काय आहे कारण?
खडकवासला धरण पुणेकरांची तहान भागवतं जर धरणातील पाणीसाठा कमी झाला तर पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. रंगपंचमीदिवशी सर्वजण आनंद घ्यायला आणि रंगपंचमी साजरी करायला अनेकजण धरणावर जायचा प्लॅन करतात. याचपार्श्वभूमीवर सामाजिक भान जपण्याच्या उद्देशाने धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने खडकवासला जलाशय रक्षण अभियान चालवलं होतं.

 

गेल्या 21 व्या वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती हे अभियान राबवत आहे. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. हिंदु जनजागृती समितीला पुणे पोलीस आणि पाटबंधारे विभागानेही मदत केल्याचं हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सांगितलं.

या अभियानाला पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले अश्या प्रकारे सहभागी होत हे अभियान यशस्वी केले. अशाच प्रकारे रंगपंचमी आणि धुलिवंदनला दरवर्षी अभियान राबवण्यात येतं.