Pune Raj Thackeray : पुरोहित वर्गाच्या आशीर्वादासह पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे स्वागत भव्य करण्यात आले. त्यात कार्यकर्त्यांसह आता पुरोहितवर्गही पुढे आला आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Pune Raj Thackeray : पुरोहित वर्गाच्या आशीर्वादासह पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना
पुरोहित वर्ग राज ठाकरेंना आशीर्वाद देतानाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 9:57 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात आहेत. येथील पुरोहित वर्गाने राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. पुरोहित राज ठाकरेंना आशीर्वाद देत आहेत. पुरोहित (Purohit) राज यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले आणि शांती मंत्राचे पठण केले. शंखनादही यावेळी करण्यात आला आहे. मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे स्वागत भव्य करण्यात आले. त्यात कार्यकर्त्यांसह आता पुरोहितवर्गही पुढे आला आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आधीच हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीमधील सर्व पुरोहित राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. पुण्यातून औरंगाबादसाठी राज ठाकरे रवाना बोतील. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून नंतर राज ठाकरे औरंगाबादकडे (Aurangabad) मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.

मंत्रोच्चाराच पुरोहितांनी दिले आशीर्वीद

राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या घरी मंत्रोच्चारही होणार आहेत, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार असल्याचे सांगण्यात आले होते. औरंगाबादच्या सभेपूर्वी या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशीर्वाद देणार आहेत, त्यासाठी मनसेने पोस्टरही छापले होते. त्या पोस्टरवर हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन, असा मजकूर छापण्यात आला होता तसेच यावर त्याची वेळ आणि पत्ताही देण्यात आला होता. त्याप्रमाणे पुरोहितवर्गाने मंत्रोच्चारात राज ठाकरेंना आशीर्वाद दिले.

हजारो कार्यकर्ते सोबत

राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे. तर राज ठाकरे औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत. त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे स्वागत केले जाणार आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही असेल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.