Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत नळावरचा ‘राडा’ थेट पोहचला पोलीस स्टेशनात ; जातीवाचक शिव्या अन…

आमच्याकडे पाणी भरायला येऊ नको, असे म्हणून जातीवाचक बोलून दगड फेकून मारून तसेच लोखंडी राॅडने मारून फिर्यादीला जखमी केले. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलीसात फिर्याद दिली आहे.

Pimpri-Chinchwad crime| पिंपरीत नळावरचा 'राडा' थेट पोहचला पोलीस स्टेशनात ; जातीवाचक शिव्या अन...
नळावर पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:45 AM

पिंपरी – शहरात उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडं शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडाही(water Shortage)  जाणवत आहे. यातूनच अनेकदा वादावादीचे प्रकारही घडून येत आहेत. अशी घटना पिंपरीतील तळवडे (Talawade) येथे घडली आहे. नळावर पाणी( भरण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला कि एकमेकांना जातिवाचक शिव्या देण्यात आल्या. या भांडणात मारहाण करत महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकराणी चिखली पोलीस (chikhali  police) स्थानकात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळेगाव येथील सहयोग नगर येथे ही घटना घडली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी व आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. पहिल्या फिर्यादीची मुलगी राहत्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सामाईक नळावर पाणी भरण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपींनी तिला पाणी भरू दिले नाही. त्यामुळे फिर्यादीची पत्नी नळावर गेली असता आरोपींनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली.मात्र त्यानंतर स्वतः फिर्यादी तिथे गेले, मात्र आरोपीने त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. ‘ आमच्याकडे पाणी भरायला येऊ नको, असे म्हणून जातीवाचक बोलून दगड फेकून मारून तसेच लोखंडी राॅडने मारून फिर्यादीला जखमी केले. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलीसात फिर्याद दिली आहे. तर दुसऱ्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एका महिलेसह तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुकानामधून घरामध्ये पाणी भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपी महिलेने घरामध्ये प्रवेश केला. तू पाणी का भरते, तुमच्यामुळे मला पाणी भेटत नाही, असे बोलून आरोपी महिलेने फिर्यादीला ओढत घराबाहेर आणले. इतर आरोपींनी मानसिक खच्चीकरण होऊन फिर्यादी महिलेचा विनयभंग केला आहे. आरोपी एवढ्यावरच ना थांबता त्याने अत्यंत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

वादावादीचे प्रकार वाढले

उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.  यामुळे अनेकठिकाणी वादावादीचे प्रकार घडून येत आहे. काही प्रसंगात वादावादी तात्पुरत्या स्वरूपाची असते. मात्र काही वेळा यातून हाणामारीपर्यंत प्रकरणे जातात. असे निदर्शनास येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपुरात Belt मध्ये अडकला कंत्राटी कामगार, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने मृत्यू

Pune crime : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ काढून धमकीही दिली?

Transit of Mercury | धन, बुद्धिमत्ता, व्यवसायाचा कारक बुधाचे होणार संक्रमण, 24 तासांत बदलणार 4 राशींच्या लोकांचे भाग्य

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.