पुणे : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन वनअधिकारी पदावर रुजू होणाऱ्या दर्शना पवार हिची हत्या झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षे उत्तीर्ण होऊन वर्ग एक अधिकारी होण्यापूर्वी तिची हत्या झाली. तिचा मित्र असलेल्या राहुल हंडोरे यांनेच तिची हत्या केली. दर्शना पवार याच्या हत्येनंतर राहुल हंडोरे फरार झाला होता. गोवा, पश्चिम बंगालमध्ये तो गेला होता. त्यानंतर २२ जून रोजी तो मुंबईत आला असताना त्याला अटक केली होती. त्यानंतर तो पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरी याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर हंडोरे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हंडोरे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 18 जून रोजी दर्शना पवार हिची हत्या झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याला अटक केली होती.
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे मित्र होते. राहुल याला दर्शना हिच्याशी लग्न करायचे होते. परंतु दर्शना त्यास नकार देत होती. त्यामुळे राहुल हंडोरे याने दर्शना पवार हिला १२ जून रोजी राजगडावर फिरण्यासाठी नेले होते. त्यानंतर लग्नाचा विषय काढला. परंतु दर्शना हिने नकार दिला. त्यामुळे त्याच ठिकाणी तिची हत्या करुन तो फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही राजगडावर जाताना दिसत होते. परंतु राहुल एकटाच परत आल्याचे दिसले. त्यानंतर राहुल फरार झाला होता. त्याला २२ जून रोजी मुंबईत अटक केली गेली.