Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: 1 जुलैपासून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 40 रुपयांनी घटणार

Railway | लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली होती.

मोठी बातमी: 1 जुलैपासून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 40 रुपयांनी घटणार
प्लॅटफॉर्म तिकीट
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 7:57 AM

पुणे: रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे (Railway) प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येतील. 1 जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होईल. (Railway will reduce platform ticket rates from 1 July 2021)

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली होती. तसेच हे तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडण्यास नागरिकांनाच दिले जात होते.

मात्र, आता रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी दिली.

इंद्रायणीसह 11 रेल्वे जुलै महिन्यापासून सुरु होणार

राज्यातील कोरोनाची साथ ओसरल्यामुळे रेल्वे विभागाकडून जुलै महिन्यात इंद्रायणीसह 11 एक्स्प्रेस गाड्या पुन्हा सुरु केल्या जातील. काही दिवसांपूर्वीच मुंबई-नाशिक प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-नाशिक अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता.

डेक्कन क्वीन 26 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या 26 तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होईल. व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. या कोचची खास अशी रचना केली गेली आहे की 180 किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेल. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे प्रवास अधिक मनोरंजक बनवतात.

संबंधित बातम्या:

PHOTO | मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास सुखद होणार, काचेच्या छताच्या व्हिस्टाडोम कोचमधून घेऊ शकता निसर्ग सौंदर्याचा आनंद

रेल्वे तिकिट रद्द केल्यानंतर तात्काळ रिफंड हवाय? मग IRCTC च्या ‘या’ अॅपवरुन बुकिंग करा

प्लॅटफॉर्म तिकिटावरही ट्रेनमध्ये प्रवास करता येतो? अचानक गाडी सुरू झाल्यास काय करायचं?

(Railway will reduce platform ticket rates from 1 July 2021)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.