Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 7:17 PM

पुणे | 28 जुलै 2023 : महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील तीन-चार जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नांदेड, पुणे या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अनेक भागांमध्ये नद्यांना पूर आलाय, घरं पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. रायगडच्या इर्शाळवाडी गावावर डोंगराचा भला मोठा कडा पडला. त्यामुळे संपूर्ण गाव चिरडलं गेलं. राज्यभरात धुमाकूळ घालणारा हा पाऊस आता किती दिवस मुक्काम करणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रासाठी पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं आहे. राज्यासाठी आता रेड अलर्ट टळला आहे. याशिवाय महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये पाऊस कमी होणार आहे. महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीची स्थिती नाही. पावसाचा जोर कमी होत जाणार, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कोकणसाठी ऑरेंज अलर्ट

कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही आता अतिवृष्टी होणार नाही. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पावसाचा जोर उद्यापासून आणखी कमी होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ सर्व ठिकाणी आता वातावरण नॉर्मल आहे. तरीही आजसाठी कोकण, ठाणे, रायगड, पालघर, रत्निगिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण पुढच्या पाच दिवसांत कुठेही अतिवृष्टीची शक्यता नाही, असं डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार

चंद्रपुरात शहरात पावसाचा मोठा फटका बघायला मिळाला. शहरातील घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी आलं. नागरीक स्वत:ला वाचवण्यासाठी घराच्या छतावर गेले. घटनेचं गांभीर्य लक्षात एनडीआरएफची टीम शहरात मदतीला लागली. घरात कुणी आहे का? असा आवाज देत एनडीआरएफच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी नेलं. एनडीआरएफच्या जवानांनी अशापद्धतीने 70 पेक्षा जास्त जणांना सुरक्षितस्थळी हलवलं.

ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडला. कल्याणमध्ये काल प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.