Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Vs Ajit Pawar : मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका ‘जशास जशी’; तर अजित पवार म्हणतात…

तीन तारखेपर्यंत हे भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकीकडे राज ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र समंजस भूमिका घेत शांततेचे आवाहन केले आहे.

Raj Thackeray Vs Ajit Pawar : मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका 'जशास जशी'; तर अजित पवार म्हणतात...
राज ठाकरे/अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 3:15 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. तीन तारखेपर्यंत हे भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकीकडे राज ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र समंजस भूमिका घेत शांततेचे आवाहन केले आहे. राज्यातली शांतता टिकून राहावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. संविधानही आपल्याला हेच शिकवते. या संविधानामुळेच देशात शांतता आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे राज्यात सध्या या दोन भूमिका महत्त्वाच्या नेत्यांनी मांडल्या आहेत. त्याचे पडसाद कसे उमटतात, ते पाहावे लागेल.

काय इशारा दिला होता राज ठाकरेंनी?

मशिदींवरचे भोंगे हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. हे भोंगे माणुसकीच्या नात्याने काढावेत. 3 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल, असे ते म्हणाले. तर आमच्या प्रार्थनेला विरोध कराल, तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला.

अजित पवारांची सर्वसमावेशक भूमिका

सर्व जातीधर्मात एकोपा राहावा, कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. इतर देशांत जसे श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशात काय चालले आहे, याचा विचार करा. आपला मोठा देश एकोप्याने राहावा, याचा प्रयत्न सर्वांनी करावा, हे संविधानात सांगितले आहे. त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले. सध्या राज्यात, देशात काहीजण जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. जातीय वादंगाचा सर्वाधिक फटका हा गरिबांना बसतो, असे ते म्हणाले.

आणखी वाचा :

Raj Thackeray : देशातील हिंदूंनो तयार राहा, 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही तर जशास तसे उत्तर देऊ; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Baramati : गुणरत्न सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लांखांचं बक्षीस? काय म्हणाले कामगार नेते?

Indapur : हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका; दत्तात्रय भरणेंची जहरी टीका

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.