Raj Thackeray : येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार, राज ठाकरे यांची मोठी घोषणा
देशातील हिंदूंनो तयार रहा. येत्या 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
पुणेः येत्या पाच जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केली आहे. तसेच 1 मे रोजी आपली औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते पुण्यात बोलत होते. राज म्हणाले की, देशातील आता हिंदूंनो (Hindu) तयार रहावे. येत्या 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही, तर जशास तसे उत्तर देऊ. भोंग्याचा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्याचा त्रास केवळ हिंदूंना नाही, तर मुस्लिमांनाही होतोय. हा विषय सामाजिक आहे. त्याकडे त्या अंगाने पाहावे. मला कल्पना नाही कोण व्यक्ती आहे. इथे एक मुस्लीम (Muslim) पत्रकार आहेत. ते नांदगावकरांना भेटले आणि सांगितले माझे लहान मुल जन्माला आले, तेव्हा सकाळची बांग आणि अजान दिली जायची. मी स्वःत मशिदीत जाऊन त्यांना गोंगाट होतोय, तो बंद करा सांगितले. हा त्रास केवळ हिंदूंना नाही मुस्लिमांनाही होतोय. हा विषय अनेक वर्षापासुन सुरू आहे, पण तसाच आहे. तो पुढे गेला नाही. त्यामुळे तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
देशापेक्षा धर्म मोठा नाही
राज म्हणाले की, सर्व मशिदीवरील लाउडस्पीकर अनधिकृत आहेत. ते काढले जात नाहीत. तर आमच्या पोरांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनधिकृत कशा मानता, असा सवाल त्यांनी केला. त्यांना परमीट देऊ नका. अशा भोंग्यांना परमीट देऊ नका. मुस्लिमांनाही काही गोष्टी समजल्या पाहिजे. या देशापेक्षा धर्म मोठा नाही.
योग्य वेळ आल्यास बोलेन…
राज ठाकरे म्हणाले की, आम्ही बोलल्यावर ते बोलणार. पुन्हा आम्ही बोलायचं. मला वाटतं जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा अनेक गोष्टी मी बोलेन. त्यामुळे आजची पीसी देशभरातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की, लोकांना वाटतं की भोंग्याचा धार्मिक विषय आहे. पण मी भाषणात स्पष्ट केलं.