Raj Thackeray : राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या, हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी केली आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून राज्यात हिंदूत्वावरून रोज राजकारण रंगताना पहायला मिळतंय.

Raj Thackeray : राज ठाकरे असुरक्षित? राज ठाकरेंना तात्काळ संरक्षण द्या, हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांची  मागणी
गुन्हे दाखल झालेले कार्यकर्ते राज्य ठाकरेंच्या भेटीलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 3:28 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेवरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंना धमकी आल्याचे बुधवारीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंची सुरक्षा (Raj Thackeray Security) वाढवण्याची मागणी अनेक संघटना करत आहे. आता पुण्यातूनही याच मागणीने जोर धरलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी केली आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून राज्यात हिंदूत्वावरून रोज राजकारण रंगताना पहायला मिळतंय. त्यानंतर मशीदीवरील भोंग्यांनीही राजकाणातील भोंग्याचा आवाज वाढवला. आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणार विरोध आणि त्यांना आलेल्या धमक्या यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिलिंद एकबोटे यांची नेमकी मागणी काय?

राज ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यासोबतच मिलींद एकबोटे यांनी यावरही प्रकाश टाकला आहे की राज ठाकरे यांनी प्रखरपणे हिंदूत्वाचे समर्थन केल्यानंतर जिहादी मनोवृत्तीच्या संघटनांनी त्यांना धमक्या देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यांना संपूर्ण पोलीस संरक्षण देणे हे महाराष्ट्र शासनाचे कर्तव्य आहे, असे मत एकबोटे यांनी मांडले आहे. शासनाने जनतेच्या भावनांचा आदर राखून राज ठाकरे यांना संपूर्ण पोलिस संरक्षण द्यावं, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका उचलून धरल्यापासून अनेक हिंदू संघटना राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. तर अनेक संघनांचा त्यांना विरोधही होत आहे. राज ठाकरेंच्या भाषणांमुळे धार्मिक तेढ पसरत आहे, असा आरोपही या संघटना करत आहेत.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यालाही आव्हान

राज ठाकरे यांनी पुण्यातून त्यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. लवकरच मी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे, असे राज ठाकरे यांनी सागितले. त्यानंतर या दौऱ्याची तारीखही ठरली. मात्र या दौऱ्याची तारीख ठरताच उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना आता उत्तर प्रदेशात यायाचे असेल तर त्यांनी आधी जनतेची माफी मागवी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच राज ठाकरेंनी यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. असा पवित्राही त्यांनी घेतला. राज ठाकरे यांना रोखण्यासाठी पाच लाखांची फौज तयार असल्याचे त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सांगतिले. तोही मुद्दा सध्या चांगलेचा चर्चेत आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.