Raj Thackeray : उद्याच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? अटी काय? तेही वाचा

या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत.

Raj Thackeray : उद्याच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? अटी काय? तेही वाचा
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 6:58 PM

पुणे : पुण्यात उद्याच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय. राज ठाकरेंची ही सभा (Pune MNS) गेल्या तीन सभांसारखीच वादळी होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली. तर बाळासाहेब झाल्यासरखे वाटणार अनेकजण सध्या फिरत आहे. कध हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा, म्हणत राज ठाकरे यांना थेट डिवचलं होतं. त्यामुळे राज ठाकारे पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगिती केला. त्यावरही ते खुलेपणे बोलणार आहेत. या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत. औरंगाबादेतल्या सभेलाही स्थानिक पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या मात्र यातल्या अनेक अटींचं पालन न झाल्याने राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला अटी काय?

  1. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत ही पहिली अट आहे.
  2. सभेत रुढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी ही दुसरी अट आहे.
  3. सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे, अशी तिसरी अट पुणे पोलिसांनी घातली आहे.
  4. कार्यक्रमात शस्त्र, तलवारी, बाळगू नये, तसेच कायदेशीर नियमांचं पालन व्हावं, असे पोलिसांनी बजावलं आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे.
  7. सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वयंशिस्त पाळावी, ही सहावी अट आहे.
  8. या सभेचे नियम पाळावे हे लोकांना कळवण्याची जबाबादारी ही आयोजकांवर असणार आहे.
  9. सभेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास, किंवा चेंगराचेंगरी झाल्यास याला आयोजक जबाबदार असणार आहे.
  10. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करता येणार नाही.
  11. व्यासपिठावरील संख्या ही निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
  12. स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
  13. कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका, वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  14. सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.