VIDEO: सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही; राज ठाकरेंचा मार्मिक टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांना राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवाल केला गेला. (raj thackeray)

VIDEO: सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही; राज ठाकरेंचा मार्मिक टोला
raj thackeray
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 12:59 PM

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांनी मीडियाशी संवादही साधला. यावेळी त्यांना राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवाल केला गेला. त्यावर राज्य सरकारचा कारभारच बघायला मिळाला नाही, असा मार्मिक टोला राज यांनी लगावला. (raj thackeray reaction on uddhav thackeray government)

राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्य सरकारच्या कारभारावर समाधानी आहात का?, असा सवाल त्यांना यावेळी केला गेला. त्यावर, या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात सरकारचा कारभार मूळात अजून बघायला मिळाला नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करायचं?, असा सवाल राज यांनी केला.

ईडीचा गैरवापर होतोय

ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

निवडणुकीची रणनीती तुम्हाला का सांगू?

यावेळी राज यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलं. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.

राजकीय पक्षांचे कान उपटले

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरूनही राजकीय पक्षांचे कानउपटले. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला. (raj thackeray reaction on uddhav thackeray government)

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?; राज ठाकरेंचा सवाल

पंकजा मुंडेंचा दिल्ली दौरा पक्ष बैठकीसाठी की नाराजी कानावर घालण्यासाठी? वाचा 5 मोठे मुद्दे

(raj thackeray reaction on uddhav thackeray government)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.