Raj Thackeray : अशा “लवंड्यांना” म्हणत राज ठाकरेंकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर, भोंग्यांवरूनही पुन्हा बजावलं
राज ठाकरेंनी अशा लवंड्यांना...म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याही टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना. नवहिंदू ओवैसी असा उल्लेख केला तर मनसेला नवहिंदुत्ववादी एमआयएम असे म्हटले होते.
पुणे : राज ठाकरेंची (Raj Thackeray) गुढी पाडव्याची सभा पार पडल्यापासून राज्यात मशीदीवरील भोग्यांचा मुद्दा तापला आहे. राज ठाकरेंनी यासाठी ईदचा (Eid) अल्टिमेटम दिला आहे. आज पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी अशा लवंड्यांना…म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याही टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना. नवहिंदू ओवैसी असा उल्लेख केला तर मनसेला नवहिंदुत्ववादी एमआयएम असे म्हटले होते. संजय राऊत यांच्या या टीकाला राज ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अशा लवंड्यांबद्दल मी जास्त बोलत नाही, म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना जोरदार टाला लगावला आहे. राज ठाकरेंनी हा शब्द काही दिवसांपूर्वीच ठाण्यातल्या सभेत वापरला होता.
अशा लवंड्यांबाबत बोलत नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतल्या शिव्यांचाही राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सबेत जोरदार समाचार घेतला होता. आमचे आजोबा अशांना लवंडे म्हणायचे, असे म्हणत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोलेबाजी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत. राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा पार पडल्यापसून दोन्ही बाजूने जोरदार वार पलटवार सुरू झाले आहेत. राज ठाकरे यांनी आयोद्येच्या सभेची घोषणा केल्यापासून पुन्हा यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच बोलताना राज ठाकरे यांना टोलेबाजी केली होती. शिवसेना रामजन्म भूमीच्या लढ्यात पहिल्यापासून आहे. प्रभु श्री. राम सर्वांचे आहेत त्यामुळे कोणत्याही गेल्यास हरकत नाही. सर्वांनीच जायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी राम जन्मभूमीत मंदिर उभं करण्यासाठी खरा लढा निर्माण केला आहे.तसेच आमचा राजकीय दौरा नाही. हा आमचा श्रद्धेचा दौरा आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच भाजपनं ओवेसींचा वापर जसा केला तसा भाजप नवं हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवीन महाराष्ट्रात ओवीसी तयार करत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये देखील अशाच पद्धतीने ओवीसी तयार करून भाजपने विजय प्राप्त केला आहे. दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रामध्ये दंगली व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
Sanjay Raut: दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, संजय राऊत यांचा मोठा आरोप