Pune Raj Thackeray : चाहत्यांच्या प्रेमानं भारावले राज ठाकरे, पुणे भेटीत नागरिकांना नमस्कार केला अन् शुभेच्छाही स्वीकारल्या

गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तके राज ठाकरे यांनी खरेदी केली आहेत.

Pune Raj Thackeray : चाहत्यांच्या प्रेमानं भारावले राज ठाकरे, पुणे भेटीत नागरिकांना नमस्कार केला अन् शुभेच्छाही स्वीकारल्या
पुस्तके खरेदी करताना राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 3:13 PM

पुणे : अक्षरधारा पुस्तक खरेदी करून बाहेर आल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बराच वेळ थांबलेल्या अनेक महिला व नागरिकांच्या जवळ येऊन नमस्कार केला व शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी भरपूर पुस्तके (Books) खरेदी केली आहेत. या पुस्तक खरेदीला जातानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, जगू द्या, असे यावेळी ते माध्यमांना बोलल्याचेही सर्वत्र व्हायरल (Viral) झाले आहे. यादरम्यान राज ठाकरे यांनी 200हून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी अक्षरधारा बुक गॅलरीतून तब्बल 50 हजारांची पुस्तके खरेदी केली आहेत. विविध विषयांवरील तब्बल 200हून अधिक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे.

विविध पुस्तके खरेदी केली

गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी रियासतचे आठ खंड, मृत्यूंजय या पुस्तकाची नवी आवृत्ती यासोबतच अनेक ऐतिहासिक, आत्मचरित्र आणि कला क्षेत्रातली पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत. पुस्तके खरेदी करत असताना राज ठाकरे यावेळी थांबलेले असताना अनेक महिला तसेच नागरिक त्यांच्या जवळ येत होते, स्वाक्षरी मागत होते. त्यांचे प्रेम पाहून राज ठाकरे यांनीही त्यांना वेळ दिला. त्यांना नमस्कार करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. काहींना त्यांनी स्वाक्षरीही दिली.

हे सुद्धा वाचा

माध्यम प्रतिनिधींवर संतापले राज ठाकरे

राज ठाकरे हे अक्षरधारा बुक गॅलरीला भेट देण्यासाठी आले असता, तिथे अनेक माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे कॅमेऱ्यावर फोकसही लावण्यात आला होता. मात्र, त्याचा त्रास जाणवू लागल्याने राज यांनी ते बंद करायला लावले. त्यावेळी थोडे पुढे येत काय जगू द्याल की नाही? बंद कर ते.. वेगळे सांगू का सगळ्यांना? असे राज ठाकरे म्हणाले. त्यांचा संताप यावेळी पाहायला मिळाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.