Raj Thackeray: आज दुपारी राज ठाकरे पुण्यात पोहोचणार ; अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात होणार सभा
राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पुण्यात सभा घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदाजे 21 ते 28 मे या दरम्यान ही सभा होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. एवढंच नव्हेतर पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 20 ठिकाणी सभेच्या जागेसाठी पाहणी करून पत्र देण्यात आली आहेत
पुणे – महाराष्ट्र नवा निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें (Raj Thackeray) आजपासून पुणे दौऱ्यावरअसून आज दुपारी ते पुण्यात पोहचणार आहेत. यानंतर आज केवळ वैयक्तिक भेटीगाठी घेण्यात येणार आहेत.त्यानंतर रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये उद्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवली जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar)यांनी दिलीआहे. त्यामुळे आज मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांच्या सोबत राज ठाकरे संवाद या साधणार नाहीत. हे निश्चित झाले आहे. पुण्याच्या दौऱ्यासाठी राज सकाळीच शिवतीर्थावरून रवाना झाले आहेत. रात्री होणाऱ्या बैठकीत उद्याच्या कार्यक्रमाची (Program) रूपरेषा ठरली जाणारा आहे.
पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही
राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसे नेते वंसत मोरे यांची भेट घेऊ त्यांची नाराजी दूर करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही असे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून पक्षात आपण एकाकी पडलो आहोत. स्थानिक नेते जाणीवपूर्व आपल्या टाळत असे म्हणत वसंत मोरे यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली आहे . यामुळे पुणे मनसेमध्ये सर्व काही आलबेल आहे का? यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. पुण्यात अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे.
उद्या सभेचे ठिकाण व वेळ जाहीर केली जाईल
राज ठाकरे अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पुण्यात सभा घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदाजे 21 ते 28 मे या दरम्यान ही सभा होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. एवढंच नव्हेतर पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण 20 ठिकाणी सभेच्या जागेसाठी पाहणी करून पत्र देण्यात आली आहेत. आज रात्री होणाऱ्या बैठकीनंतर उद्या सभेचे ठिकाण व वेळ जाहीर केली जाईल अशी माहिती बाबू वागस्कर याने दिली आहे.