Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Raj Thackeray rally : 22 मेला होणार राज ठाकरेंची पुण्यात सभा? विश्वसनीय सुत्रांची माहिती; लवकरच अधिकृत घोषणा

आगामी अयोध्या दौऱ्याची वातावरणनिर्मिती सध्या मनसेकडून होत आहे. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. अयोध्येला जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी येण्यासाठी आवाहन करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे.

Pune Raj Thackeray rally : 22 मेला होणार राज ठाकरेंची पुण्यात सभा? विश्वसनीय सुत्रांची माहिती; लवकरच अधिकृत घोषणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:35 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा 22 मेला होणार आहे. पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंच याठिकाणी ही सभा होणार असल्याची विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. मनसेकडून (MNS) अद्याप यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येथील बुकिंगचे पैसे भरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बंद सभागृहात ही सभा होणार असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांची पुण्यातील सभा जंगी होणार आहे. मनसेने आता याची तयारी सुरू केली आहे. पुणे दौऱ्यावर असताना काल मनसेची बैठक होती. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कालच्या मनसेच्या शहर कार्यकारीणी बैठकीत पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. सभेला जास्तीत नागरिकांना येण्याचे आवाहन करा, सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करा, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. औरंगाबाद मनसेने (Aurangabad MNS) सभेची जशी तयारी केली होती, तशी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अयोध्या दौऱ्याची तयारी

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. ती चारदरम्यान संपेल. त्यानंतर स्वत: राज ठाकरे ट्विट करून याबाबतची माहिती देतील. या आठवड्याच्या शेवटी सभा होण्याची शक्यता आहे. दोन ठिकाणची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे आता कुठे सभा होणार, याची उत्सुकता आहे. आगामी अयोध्या दौऱ्याची वातावरणनिर्मिती सध्या मनसेकडून होत आहे. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. अयोध्येला जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी येण्यासाठी आवाहन करा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी केली आहे. मनसेच्या पुण्यातील सभेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे औरंगाबादप्रमाणे पुण्यातील सभाही जंगीच होणार असल्याचा कसाय बांधला जात आहे. पुण्यातील या सभेसंबंधी राज ठाकरे स्वतः जाहीर माहिती देणार असल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांना समज देणार?

एकीकडे राज ठाकरे शहरातल्या पदाधिकाऱ्यांना सभा जंगी करण्याच्या सूचना करत आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यातून बाहेर पडताच कार्यकर्ते मात्र एकमेकांमध्ये भिडताना दिसून येत आहेत. काल रात्री शिवाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मागील अनेक महिन्यांपासून पुण्यात मनसेची धुसफूस पाहायला मिळत आहे. मात्र राज ठाकरेंकडून त्यावर काही तोडगा निघाला नसल्याचे कालच्या ताज्या राड्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी सूचना केल्या असल्या तरी पुण्यातील सभा जंगी होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. तर झालेल्या गोंधळानंतर राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना समज देणार का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.