Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडणार?
अयोध्याच्या दौऱ्याला जाण्यापूर्वी मे च्या शेवटच्या आठवड्यात राज ठाकरे पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी मनसे नेत्यांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली आहे. पुण्यातील या सभेबाबत चर्चा सुरु आहेत. परंतु सभेची तारीख ठरलेली नाही. मात्र या दोन दिवसांच्या दौऱ्यात आयोध्याचे दौऱ्याचे नियोजन, तसेच पुण्यातील संभाव्य जाहीर सभेचे नियोजन केले जाणारा आहे.
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा मशिदीवरील भोंग्यांचा विषय चांगलाच गाजत आहे.यावरून पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली होती. यातून निर्माण झालेलं वसंत मोरे यांचे नाराजी नाट्य, पदाधिकारी व त्यांच्यातील दुरावा सातत्याने समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही (Meeting)हा वाद समोर आला होता. उद्यापासून सुरु होणाऱ्या राज ठाकरेंच्या दौऱ्यात या नाराजी नाट्याचा शेवट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे स्वतः पदाधिकारी व वंसत मोरे यांच्या असलेला दुरावा दूर करण्यास यश येणार का , वंसत मोरेंनी सातत्याने उघडपणे बोलून दाखवलेल्या नाराजी नाट्यावर पडदा पडणारा का? अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
जाहीर सभा होणार?
अयोध्याच्या दौऱ्याला जाण्यापूर्वी मे च्या शेवटच्या आठवड्यात राज ठाकरे पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी मनसे नेत्यांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली आहे. पुण्यातील या सभेबाबत चर्चा सुरु आहेत. परंतु सभेची तारीख ठरलेली नाही. मात्र या दोन दिवसांच्या दौऱ्यात आयोध्याचे दौऱ्याचे नियोजन, तसेच पुण्यातील संभाव्य जाहीर सभेचे नियोजन केले जाणारा आहे. या सोबतच पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवादही साधण्यात येणार आहे.
दौऱ्याची तयारी सुरु
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुण्यात मनसेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्या शहर कार्यालयात होणार सदस्य नोंदणीला सुरुवात अयोध्याच्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या मनसैनिकाची नावं नोंदवली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहेत. सकाळी 10 वाजल्या पासून अयोध्या दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. उद्यापासून सुरु राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यात येणार आहे.