पुणे : राज्यात सध्या नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या एमआरएवरून बराच गदारोळ सुरू आहे. कारण लिलावती रुग्णालय (Lilavati Hospital) प्रशासन फोटो प्रकरणावरून चौकशीच्या फेऱ्यात आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी थेट लिलावती रुग्णालयात दाखल होत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. त्यावर सोमवारी दिवसभर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आता यावरूनच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही सुनावलं आहे. सिटी स्कॅन , MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्य मंत्री असताना कुठं पाहिली नाही, आशा पद्धतीच फोटो शेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल हे पण चुकीचं आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तर यात राजकारण करण्याचा काम करू नये, असेही त्यांनी बजावलं आहे.
दरम्यान टोपेंनी कोरोनाची सध्यस्थिती आणि इतर विविध मुद्यावरही भाष्य केले आहे. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सुतोवाच नाही, सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे, ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बठक झाली. त्या राज्यातही रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी टोपेंनी दिली आहे.
आरोग्य भरतीसंदर्भात विधानसभेत आश्वासन दिले आहे. पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते, पोलिसांचा डिटेलअंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे, ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे, तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही मत लक्षात घेतलं आहे, दोन्हीही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ, त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यात झाला आहे, अशी माहिती आरोग्यभरती बाबत राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षांचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले आहे. यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकाही होत आहे. आता हे प्रकार भविष्यात घडून नये यासाठी शासन ठोस पाऊलं उचलत आहे.