Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajgad Fort : वेल्हा राजगड किल्ल्यावर प्रवेशद्वार महादुर्गार्पण सोहळा उत्साहात, शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सात दरवाजे बसवण्यात आले

स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले तालुका येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने किल्ल्यावरील सात प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Rajgad Fort : वेल्हा राजगड किल्ल्यावर प्रवेशद्वार महादुर्गार्पण सोहळा उत्साहात, शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सात दरवाजे बसवण्यात आले
वेल्हा राजगड किल्ल्यावर प्रवेशद्वार महादुर्गार्पण सोहळा उत्साहातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 7:29 AM

पुणे – पुण्यातील (Pune) वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) प्रवेशद्वार महादुर्गार्पण सोहळा पार पडला. यावेळी लोकवर्गणीतून तब्बल 7 लाकडी दरवाजे किल्यावर बसविण्यात आले. या सोहळ्यासाठी शेकडो शिवप्रेमींनी राजगडावर गर्दी केली होती. सोहळ्यासाठी मर्दानी खेळ आणि लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजगड दरवाजा परिसर विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी सजविण्यातं आला होता. सोहळ्या दरम्यान राजगड परिसर पारंपारिक वाद्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयघोषात दुमदुमून गेला होता.

सात प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले तालुका येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने किल्ल्यावरील सात प्रवेशद्वारांचे दुर्गार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने सह्याद्रीचा परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वाधिक सहवास लाभलेल्या व स्वराज्याची पहिली सव्वीस वर्षे राजधानी असलेल्या किल्ले राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यावतीने 30 एप्रिल दे 1 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी किल्ले राजगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या जीवन पटावर आधारित लेझर शो होता. तर किल्ले राजगडावर पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. किल्ल्यावरील पद्मावती देवी मंदिर महादेव मंदिर बाले किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली होती. रांगोळी आणि भगवे ध्वज लावून संपूर्ण किल्ला सजवला गेला होता.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून घरकुल सोहळ्याचे आयोजन

छत्रपतींचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील दोन प्रवेशद्वार गुंजवणे कडून येणाऱ्या चोर मार्गावरील तीन प्रवेशद्वार तर संजीवनी माचीवरील आणि बालेकिल्ल्यावरील प्रत्येकी एक प्रवेशद्वार असे एकून सात दरवाजे बसवण्यात आले. फुलांची सजावट करून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून लोकसहभागातून प्रवेशद्वार बसविण्यात आले आहेत. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून घरकुल सोहळ्याचे आयोजन स्वराज्याचे महाद्वार दुर्गा अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून हजारो शिवप्रेमी दुर्गप्रेमी यांनी राजगडावर हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण कार्यकर्ते ढोल-ताशांचा संबळ डफ तुतारीचा निनाद भंडाऱ्याची उधळण करत होते. त्यामुळे छत्रपतींच्या जयघोषाने संपूर्ण राजगड परिसर दुमदुमून गेला. किल्ल्यावरील सदरे समोर शिवकालीन मर्दानी खेळ आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश कुटवाड योगेश रेणुसे मकरंद शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे शेकडो दुर्ग सेवक आणि दुर्गप्रेमी पर्यटक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.