Video : पर्यटकांनी फुलली कात्रजची बाग; पहिल्यात दिवशी Rajiv Gandhi Zoological Parkमध्ये पुणेकरांची गर्दी

पुण्यातील कात्रजची (Katraj) बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park) आजपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राण्यांना पाहण्याची संधी पुणेकरांसह पर्यटकांना मिळत आहे.

Video : पर्यटकांनी फुलली कात्रजची बाग; पहिल्यात दिवशी Rajiv Gandhi Zoological Parkमध्ये पुणेकरांची गर्दी
राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रजImage Credit source: maharashtratourism
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 2:03 PM

पुणे : पुण्यातील कात्रजची (Katraj) बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park) आजपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राण्यांना पाहण्याची संधी पुणेकरांसह पर्यटकांना मिळत आहे. यावेळी आशियाई सिंहासह, शेकरू, वाघाटी मांजर हे नवे प्राणी बघायला मिळणार आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी पुणेकर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रवेश दिला जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे नागरिकांना बंधने होती. त्यात कात्रजच्या या बागेचाही समावेश होता. आता मात्र कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने ही बागही सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

सकाळपासूनच रांगा

सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजल्‍यापासूनच पर्यटकांनी तिकिटासाठी रांगा लावल्या होत्या.

प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने स्वागत

दोन वर्षानंतर कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पर्यटकांना याचा मोठा आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. प्राणी संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी पर्यटकांचे स्वागत केले. यावेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार

वाघ, सिंह, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती तर चौशिंगा, तरस आदी विविध प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तर आगामी काळात झेब्रा आणि इतर काही प्राणी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. प्राणीसंग्रहालय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. विविध विकासकामेही झाली आहेत. अजून काही बाकी आहेत, तीही केली जाणार आहेत. व्हिडिओ पाहा –

आणखी वाचा :

जलसंपदा विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय ; सर्व धरण प्रकल्प, कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार

Pune metro : नाशिक फाटा चौकाला भोसरीचं नाव का? Patit Pavan Sanghatana आक्रमक, आयुक्तांना दिलं पत्र

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणाऱ्या ‘ऑनलाईन’ ; ॲपचे काम अंतिम टप्प्यात, आयुक्त आयुष प्रसाद यांची माहिती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.