शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार, FRP आणि अतिवृष्टीच्या मदतीवरुन राजू शेट्टी आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेतील ठरावांचं पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना आज त्यांच्या कार्यालयात भेट घेत दिलं.

शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार, FRP आणि अतिवृष्टीच्या मदतीवरुन राजू शेट्टी आक्रमक
राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 4:42 PM

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेतील ठरावांचं पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना आज त्यांच्या कार्यालयात भेट घेत दिलं. ऊस परिषदेतील या मागण्यांकडे ना सरकार दुर्लक्ष करू शकतं ना साखर कारखानदार असं ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी यावेळी एकरमी एफआरपी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ, साखर कारखान्यांवरील कारवाई, महापुराच्या काळातील नुकसानाची मदत यावर भाष्य केलं.

साखर आयुक्तांनी एकररकमी एफआरपीचे आदेश द्यावेत

काही साखर कारखान्यांची ऊसाची नोंदीची अट असते ती म्हणजे टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्यात येईल. ऊस पुरवठ्याचा करार वेगळा आणि ऊसाच्या नोंदीचा करार वेगळा आहे…मात्र शेतकऱ्यांकडूनच लिहून घेतलं जातं. साखर आयुक्तांनी एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. केंद्र सरकारने साखरेचे भाव हे 3700 रुपये करावी, असंही शेट्टी म्हणाले.

FRP चे तुकडे करण्याचे कारण काय ?

कारखाने तुकड्या तुकड्या दराने एफ आरपी देणार तर शेतकऱ्यांचे पैसे 32 महिने गुंतून राहणार आहेत. मग त्याच्या व्याजाचं काय ?, असा सवाल राजू शेट्टींनी केला. एफआरपी संदर्भातील ही जबाबदारी शरद पवारांची होती त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा होता.जसा नाबार्ड डेअरीला पतपुरवठा करतं तर साखरेच्या तोरण मालाचं काय, अशी विचारणा शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर साखर कारखान्यांनी बोजा टाकू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला निधी देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने ही पैसे दिले पाहिजेत आणि साखर कारखान्यांनी दिले पाहिजे. ऊसतोड महामंडळाला वेळ पडली तर शेतकरी पैसे देतील मात्र त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. ऊसतोड मजूरांना पेन्शन मिळायला हवी, असंही ते म्हणाले.

चांगल्या रिकव्हरीच्या ठिकाणी 3300 दर द्यावा

जिथं रिकव्हरी चांगली तिथं 3300 रुपये भाव मिळावा केंद्र सरकारनं जी पहिली एफआरपीची रक्कम ठरलीये ती द्यावी,असं राजू शेट्टी म्हणाले. ऊसाची वाहतूक विनाकारण शेतकऱ्यांवर लादली जाते, असंही ते म्हणाले.

चोरांना शासन झालं पाहिजे

किरीट सोमय्यांनी इतर 43 कारखान्यांची यादी डोळ्यासमोरून घालावी. आणि नंतर जरंडेश्वरचीच चर्चा का केली जाते. हे सहा वर्षापूर्वीचं आज का बोलतायेत. 43 कारखान्यांची यादी ही किरीट सोमय्यांनी का बघितली नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केलीय. सगळे चोर आहेत चोरांना शासन झालं पाहिजे. अजित पवारांनी विक्री झालेल्या 65 कारखान्यांच्या यादीसंदर्भात विचारलं असता हे कारखाने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही विकले गेले आहेत. तेव्हा त्या मंत्रिमंडळात अजित पवार होतेचं. जे भाजपात गेले त्यांच्याकडे आज क्लीन असल्याचं सर्टिफिकेट आहे. देवेंद्र फडणवीसांच्याही काळात कारखाने विकले आहेत.

शेतकऱ्यांच्या आडवा जो येईल त्याला तुडवणार आहे.ज्याला आमदारकी हवी असते तो सरकारविरोधात बोलत नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत की नाही याचा पुर्नविचार केला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारीणी याचा निर्णय घेईल, असंही राजू शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडी बनत असताना मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो. स्वाभिमानी ही मविआचा भाग आहे हे ते विसरले आहेत. मविआनं आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतल नाही. राज्य सरकारने अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना मदतीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही. जर, प्रश्न सुटत नसतील तर मी मविआवर का समाधानी असेल, असं राजू शेट्टी म्हणाले.

इतर बातम्या

जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीची ऊस परिषद, राजू शेट्टी ऊसदर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

Raju Shetti raised question over sugarcane three installment FRP and slam Thackeray Government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.