Raju Shetty : आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष तर नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष, ऑडिट कसं होणार? राजू शेट्टींचा इशारा कुणाकडे?
आयुक्तांचा दावा आहे की राज्यातले सर्व कारखाने आज बंद झालेत, गाळपाचा ऊस राज्यात शिल्लक नाही, असा दावा केलाय, आम्ही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून या दाव्याची सत्यता तपासू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर त्यांनी कारखान्यांच्या ऑडिटवरूनही सूचक विधान केलं आहे.
पुणे : आजच उसाचा गाळप हंगाम (Sugarcane) संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा विक्रमी उसाचे गाळप झाल्याचेही साखर आयुक्तींनी सांगितले आहे. तर दुसरीकडे कारखान्यांच्या ऑडिटच्या प्रश्नावरून आणि एफआरपीच्या मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर राजू शेट्टी (Raju Shetty) हे साखर आयुक्त शेखर गाडकवाड यांचीही भेट घेतली आहे. शिल्लक ऊस , थकीत एफ. आर. पी यासह विविध विषयांच्या संदर्भात ते आयुक्तांशी त्यांनी चर्चा केलीय. महाराष्ट्रात शिल्लक ऊस किती? बंद साखर कारखान्यांनी (Sugar Factory) किती इथेनॉल निर्मिती केली याची साखर आयुक्तांकडून माहिती घेतली, तसेच साखर आयुक्तांचा दावा आहे की राज्यातले सर्व कारखाने आज बंद झालेत, गाळपाचा ऊस राज्यात शिल्लक नाही, असा दावा केलाय, आम्ही मराठवाड्यातील कार्यकर्त्यांकडून या दाव्याची सत्यता तपासू, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर त्यांनी कारखान्यांच्या ऑडिटवरूनही सूचक विधान केलं आहे.
अजोबा, नातवाची जोडी असताना ऑडिट कसं होणार?
साखर कारखान्यांच्या ऑडिटबाबत बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर मधल्या केवळ 12 कारखान्यांचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ऑडिट झालं आहे. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल आमचा आक्षेप आहे, हे ऑडिट कस करणार? आजोबा व्हिएसआयचे अध्यक्ष आहेत, आणि नातू साखर कारखान्याचा अध्यक्ष असेल तर ऑडिट कस होणार? अशी टीका शेट्टी यांनी शरद पवार, रोहित पवार यांचे नाव न घेता केली आहे. तर तुकड्या तुकड्यात एफआरपी मिळत आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असेही शेट्टी म्हणाले आहेत.
ऊसतोड मजुरांना संरक्षण द्या
तसेच बंद पडलेले कारखाने सुरू केले तर पुढच्या वर्षी साखर गाळप प्रश्न भेडसावनार नाही. पुढच्या वर्षी एक रक्कमी एफआरपी घेण्यावर आम्ही ठाम आहोत. ऊस तोडणी महामंडळ यांनी मजुरांची नोंदणी करावी. त्यांना टनामागे 10 रुपये दिली जात आहेत. तसेच मजुरांची सुरक्षा महत्वाची आहे ती त्यांना द्यावी. असेही शेट्टी म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी तोफ डागली आहे. सध्या माझ्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळे राजकारणात घोडेबाजार आणि इतर विषयावर बोलायला वेळ नाही, सदाभाऊ आमच्याकडे होते तेव्हा शेतकरी नेते होते, आता ते काय आहेत हे मी ऐकून नाही, असा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा राजू शेट्टी आणि सादाभाऊ खोत वादाचा दुसरा अंक सुरू होण्याची शक्यता आहे.