Ramdas Athawale : हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडून दाखवा, रामदास आठवलेंचं काँग्रेसला थेट आव्हान

| Updated on: May 31, 2022 | 7:24 PM

जर काँग्रेस पक्षात हिंम्मत असेल तर सरकारमधून बाहेर पडावे अशा प्रकारचे काँग्रेस पक्षाला व नाना पटोले यांना आव्हान करतो म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष डिवचले आहे.

Ramdas Athawale : हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडून दाखवा, रामदास आठवलेंचं काँग्रेसला थेट आव्हान
रामदास आठवले
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज इंदापूर येथे आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारसह (Mahavikas Aghadi) पोलीस प्रशासन (Police)  यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ते कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी आले होते यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. रामदास आठवले म्हणाले ,”काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये राहू नये.जर काँग्रेस पक्षात हिंम्मत असेल तर सरकारमधून बाहेर पडावे अशा प्रकारचे काँग्रेस पक्षाला व नाना पटोले यांना आव्हान करतो म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष डिवचले आहे.

फडणवीसच योग्य मुख्यमंत्री होतील

आठवले पुढे म्हणाले की जर काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढला तर आम्ही सरकार बनवण्यास तयार असून या राज्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस योग्य आहेत. ते विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा अधिक चांगले काम करून निर्णय घेऊ शकतात व देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंदापूर येथील पत्रकार परिषदेत केले. गेल्या अनेक दिवसात महाविकास आघाडीतील धुसपूस बाहेर आली आहे. त्यावरून आता भाजप नेते महाविकास आघाडीला टार्गेट करत आहेत. आता रामदार आठवलेंनीही याचवरून पुन्हा काँग्रेसला डिवचलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पडळकरांना अडवणे चुकीचे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीचंद पडळकर हे चौंडी या गावी जात असताना पोलिसांनी त्यांना आडवले यावरती आठवले यांना विचारले असता आठवले म्हणाले की, पडळकर यांना परवानगी असेल तर पोलिसांनी त्यांच्यावरती अन्याय करणे योग्य नाही. पोलीस हे वरच्यांचे ऐकून काम करतात. अलीकडचे पोलीस हे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतात. असा आमचा पोलिसांवर आरोप आहे. पोलीस हे वर्दीचा अपमान करत आहेत. पडळकरांनी जर परवानगी काढली असेल तर त्यांना अडवायचे काहीच कारण नाही, असे आठवले म्हणाले. तर राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला अशी घणाघाती टीका ही फडणवीस यांनी केली आहे. दिवसभर यावरून बराच राजकीय गदारोळ झाला आहे. आता हा वाद वाढत चालला आहे.

हे सुद्धा वाचा