Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, भारत-पाक क्रिकेट सामना नकोच; रामदास आठवलेंचा षटकार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे. मात्र, पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे. (ramdas athawale oppose india-pakistan match)

पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, भारत-पाक क्रिकेट सामना नकोच; रामदास आठवलेंचा षटकार
ramdas athawale
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:37 PM

पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला आहे. मात्र, पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मुद्द्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहेत.

रामदास आठवले पुण्यात आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही इच्छा व्यक्त केली. पाकिस्तान बरोबर खेळू नये. पाकिस्तान अनेक हल्ले करत आहेत. माझ्या पक्षाच मत जयेश शहा यांना सांगेन. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये. खेळामध्ये राजकारण अणू नये हे खरं आहे. पण अशा परिस्थितीत खेळू नये. पण अशा परिस्थितीत 24 तारखेला होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेन्टी सामना होऊ नये अशी आमच्या पक्षाच्या भूमिका आहे, असं आठवले म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक तरी करा

अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू काश्मीर मध्ये येत असतात त्यांना आतंकवादी मारत आहेत. पाकिस्तानवर एकदा सर्जिकल स्टारईक करायला लागेल. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल तर आतंकवादी कारवाई थांबवून पाक व्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपार लढाई करायला लागेल, पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही, असं सांगतानाच पाकिस्तान या विषयावर मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वर्षभरापूर्वीच सरकार पाडलं असतं

सरकारला अस्थिर करण्याची गरज नाही. पाच वर्षे तुम्हीच सत्तेत राहा. त्यानंतर मात्र आम्हीच सत्तेत येणार आहोत. सरकार पाडायचं असतं तर वर्षभरापूर्वी सरकार पाडलं असतं, असं साांगतानाच ईडी आणि सीबीआय या यंत्रणा स्वंतत्र आहेत. त्यांच्या कारवाईचा भाजपशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्याचं महापौरपद द्या

राज्यात महापालिका निवडणुकीत आम्ही भाजप सोबत राहणार आहोत. रिपाइंला पुण्याच महापौरपद मिळालं पाहिजे. मुबंईमध्ये उपमहापौरपद मिळाले पाहिजे. पुण्यात 15 ते 20 तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्याचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

Video: आणि चोर इमारतीवरून धपकन बुडावर आदळला, पोलीसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग CCTV मध्ये कैद

मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल

(ramdas athawale oppose india-pakistan match)

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.