Ravikant Varpe : सुप्रियाताईंच्या विकासाचा डोंगर पाहायला या; निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळेंना रवीकांत वरपेंचा टोला

निर्मला सीतारामन या 2014पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेतील महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे रवीकांत वरपे म्हणाले.

Ravikant Varpe : सुप्रियाताईंच्या विकासाचा डोंगर पाहायला या; निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळेंना रवीकांत वरपेंचा टोला
भाजपावर टीका करताना रवीकांत वरपेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:04 PM

पुणे : जे राज्यसभा आणि विधानपरिषदेवर निवडून येतात, त्यांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवीकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी बावनकुळेंना लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामतीत आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा केली होती. त्याचप्रमाणे लोकसभेत देशभरात 400+ आणि राज्यात 45+ जागा जिंकणार असल्याचेही म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीच्याही प्रतिक्रिया येत आहेत. रवीकांत वरपे यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे. बावनकुळेंना साधे विधानसभेचे तिकीट मिळाले नाही. जनतेतून निवडून येता आले नाही. त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे लागते. ते बारामती जिंकण्याची भाषा करतात, असा बावनकुळेंना टोला लगावला. तर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनाही वरपेंनी लक्ष्य केले आहे.

‘सीतारामन 2014पासून राज्यसभेत’

निर्मला सीतारामन या 2014पासून राज्यसभेत आहेत. त्या संसदेतील महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करत आहेत, हे हास्यास्पद आहे, असे वरपे म्हणाले. सुप्रिया सुळे या तीनवेळा सलग लोकसभेला निवडून आलेल्या आहेत. निर्मला सीतारामन बारामती फिरायला येणार असतील, तर आम्ही बारामती मतदारसंघात केलेला विकास त्यांना दाखवू. तुम्ही निश्चित याठिकाणी या. तुम्हाला फार काळ राज्यसभेवर राहायचे नसेल तर याठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेला विकासाचा डोंगर पाहा. बारामती लोकसभेचे मॉडेल उभे केले आहे, त्याचे प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे. ते पाहावे. याचा उपयोग तुम्हाला लोकसभेत निवडून येण्यासाठी नक्कीच होईल, असा टोला सीतारामन यांना वरपेंनी लगावला.

हे सुद्धा वाचा

‘संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल माझ्याकडे’

सुप्रियाताईंनी केलेल्या कामाचे पुस्तक माझ्याकडे आहे. संसदेतील कामगिरी याविषयी सविस्तर अहवाल आणि माहिती माझ्याकडे आहे. विकासकामे असतील, रस्ते, जलसंधारण, रेल्वे अशा विविध कामांमध्ये सुप्रियाताई देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले नाही, त्या बावनकुळे तर ज्या राज्यसभेवर काम करत आहेत त्या निर्मला सीतारामन अशांनी बारामतीचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये, असे वरपे म्हणाले.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....