पुणे : राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांनी आज रेडीरेकनेरचे दर (Ready Recker Rates in Maharashtra) जाहीर केले. राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 6.96 % तर प्रभाव क्षेत्रात 3.90 % नगरपालिका, नगरपंचायत 3.62% आणि महापालिका क्षेत्रात ( मुंबई वगळून) 8.80% इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुण्याबाबत मेट्रोकरता (Pune Metro) 1 टक्के अधिभार 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आला आहे, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. लागी करण्यात आलेल्या रेडीरेकनरच्या नव्या दरांमुळे आजा घर खरेदीचं स्वप्न आणखी महागण्याची शक्यता आहे. गेली दोन वर्ष राज्यातील रेडीरेकरचे दर वाढवण्यात आले नव्हते. मात्र आता या दरांमध्ये दोन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम घरांच्या दरांवर जाणवणार आहे. मुंबई वगळता रेडी रेकनरचे दर हे लागू केले जाणार आहेत. 2022-23 वर्षासाठी हे नवे दर लागू होणार आहेत. आता मुंबई वगळता राज्यात इतर सर्वत्र घर खरेदी करणं कमालीचं महागेल, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात ग्रामीण भागातील रेडीरेकनरच्या दरात सरासरी 6.96 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात 3.62 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात 8.80 टक्के इतकी वाढ करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
रेडीरेकनरचे दर वाढवण्याआधी घरांच्या रेजिस्ट्रेशन विभागानं आधीच जमिनीचं वार्षिक बाजारमूल्य हे वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्यही करण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आता वाढ करण्यात आलेले रेडीरेकनरचे नवे दर हे नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडूनही लागू करत त्याची तातडीनं अंमलबजावणी केली जाणार आहे.
1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?
Petrol Prices: जगात जर्मनी भारतात परभणी, पेट्रोलचे सर्वात महाग पेट्रोल परभणीत का? वाचा सविस्तर