Rain : पुणे जिल्ह्यास रेड अलर्ट, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कसा असणार पाऊस

| Updated on: Jul 24, 2023 | 9:20 AM

Weather update and Rain : राज्यातील अनेक भागांमध्ये सोमवारी पाऊस सुरु आहे. विदर्भात दमदार पाऊस सुरु असल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. यवतमाळमधील परिस्थिती सुधारत आहे. हवामान विभागाने पुण्यास आज रेड अलर्ट दिलाय.

Rain : पुणे जिल्ह्यास रेड अलर्ट, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कसा असणार पाऊस
Follow us on

योगेश बोरसे, पुणे | 24 जुलै 2023 : राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर सोमवारी कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. १४ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे.

शेतांमध्ये शिरले पाणी

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण आणि वारणा नदीच्या पाणलोट मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे वारणा नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी शेतांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील मुख्य रस्त्यावरील पाणी पूर्ण ओसारले आहे. परंतु सखल भागातील सोसायटीमध्ये पाणी साचलेले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केला फोन

यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. त्यांच्याकडून संपूर्ण परिसराच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यातील परिस्थिवर स्वत: मुख्यमंत्री देखील लक्ष ठेवून आहेत.

हे सुद्धा वाचा

गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होण्याचे प्रमाण २० क्युसेकने होत आहे. सध्या धरण ८० टक्के भरलेले आहे.

पुणे जिल्ह्यास रेड अलर्ट पण शहरात प्रतिक्षा

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. परंतु पुणे शहरात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही. धरण क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पाऊस सुरु आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे जुलै महिन्यात ओव्हरफ्लो होतात. यंदा मात्र अजून तशी परिस्थिती नाही.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणाची स्थिती

खडकवासला: 73 टक्के
1.44 टीएमसी पाणीसाठा

पानशेत: 60.74 टक्के
6.47 टीएमसी पाणीसाठी

वरसगाव: 56.33 टक्के
7.22 टीएमसी पाणीसाठा

टेमघर: 39 टक्के
1.44 टीएमसी पाणीसाठा

कोयनात जोरदार आवक

कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. यामुळे आता कोयना धरण अर्धे भरले आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 51.93 TMC झाला आहे. धरणात 59,851 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात कोयनानगर 150 मिमी पाऊस झाला आहे. नवजा 201 मिमी तर महाबळेश्वर 185 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.