Pune crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं पुण्यातल्या बावधनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधम रिक्षाचालक फरार
पुण्यातील बावधन (Bavdhan) परिसरात एका रिक्षाचालकाने शुक्रवारी एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.
पुणे : पुण्यातील बावधन (Bavdhan) परिसरात एका रिक्षाचालकाने शुक्रवारी एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे. ही मुलगी एका खासगी अभ्यासाच्या शिकवणीहून परतत असताना ही घटना घडली. मुलगी स्टडी रूममधून बाहेर पडून दुपारी 3.10च्या सुमारास बावधन येथील एलएमडी चौकात आली, तेव्हा एक रिक्षाचालक (Rickshaw driver) पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ आला आणि नंतर तिचा विनयभंग केला, अशी माहिती पोलिसांनी दिलेल्या निवेदनात दिली आहे. घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत जाऊन यासंबंधीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन आहे. ती एका खासगी शिकवणीस जाते. रोजच्या प्रमाणे ती शिकवणीहून घरी जात असताना एलएमडी चौकात आली. त्यावेळी संबंधित रिक्षाचालक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्याजवळ आला आणि मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ऑटो चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (A) आणि 509 आणि लैंगिक अपराधांपासून बालकांना प्रतिबंध करण्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.