Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : ही तर 25 कोटींची पहिली खेप; पण अजून चार गाड्या आहेत कुठे? रोहित पवार यांचा घणाघात, निवडणुकीपूर्वी केला हा आरोप

Rohit Pawar attack on Mahayuti : निवडणुकीत अनेकांना लक्ष्मी दर्शन होणार याची हमी असते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडालाचा महापूर आला आहे. पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. त्यावरून विरोधकांनी महायुतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. रोहित पवारांनी तर इतर चार गाड्या कुठे आहेत, असा खोचक सवाल विचारला आहे.

Rohit Pawar : ही तर 25 कोटींची पहिली खेप; पण अजून चार गाड्या आहेत कुठे? रोहित पवार यांचा घणाघात, निवडणुकीपूर्वी केला हा आरोप
रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 12:36 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Maharashtra Vidhansabha Election 2024) राज्यात लक्ष्मी दर्शन झाले. नोटांचा पाऊस पडला. निवडणुकीपूर्वीच राज्यात नोटांच्या बंडलाचा महापूर आल्याचे चित्र समोर आले. आचारसंहिता लागल्यानंतर पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी पकडण्यात आले. रात्री घडलेल्या या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याप्रकरणी महायुतीवर चौफेर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी शहाजी बापू यांना चिमटा काढल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्यांच्या नावाची री ओढली. एक गाडी पकडली इतर चार वाहनं कुठं आहेत, असा खोचक सवाल त्यांनी केला. त्यामुळे मत विकत घेण्यासाठीच हा प्रकार होत असल्याचा जोरदार टोला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

नाकाबंदी केली नि सापडले घबाड

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यादृष्टीने आता अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पुण्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम एका आलिशान गाडीत पकडली. या आलिशान कारचे सांगोला कनेक्शन समोर आल्यानंतर विरोधकांनी शहाजीबापू यांच्याकडे मोर्चा वळवला. शहाजीबापूंनी या सर्व प्रकरणात कानावर हात ठेवले आहे. तर विरोधकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात नोटा पोहचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.

इतर चार गाड्या आहेत तरी कुठं?

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार, झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विटरवर याविषयीची पोस्ट केली आहे.

लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला.विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.