Rohit Pawar : मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या जाहिरातीवर रोहित पवार आक्रमक; म्हणाले, जरा ‘इकडं’ पण लक्ष द्या…

Rohit Pawar Maratha Reservation : नारायण राणे यांचं विधान मला पटलेलं नाही!, सरकारने ठोस भूमिका घ्यावी; मराठा आरक्षणावरूव रोहित पवार यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या जाहिरातीवरही आक्रमक प्रतिक्रिया. पाहा काय म्हणाले, आमदार रोहित पवार

Rohit Pawar : मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या जाहिरातीवर रोहित पवार आक्रमक; म्हणाले, जरा 'इकडं' पण लक्ष द्या...
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 3:58 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 23 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशात राज्य सरकारकडून वर्तमानपत्रात काल आणि आज जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जाहिराती आणि त्यातील शब्द, या सरकार बद्दल काय बोलणार? धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. किती वेळा बैठका झाल्या? त्यातून काय भूमिका घेतली गेली हे बघावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी पोलीस उपनिरिक्षकपदाच्या निकालाकडे रोहित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे.

शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे. मात्र बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी त्यांना काहीही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिली. पण त्यात शासन SEBC EWS च्या रखडलेल्या नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र, पोलीस उपनिरिक्षकपदाचे 2020चे 65 मराठा उमेदवार गेल्या 11 दिवसांपासून SEBC EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहीर करा, या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहेत. परंतु शासनाने अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही, असं रोहित पवार म्हणालेत.

सोलापूर जिल्हातील माढ्यातील पिंपळनेरचे कार्यक्रमात अजित पवार बोलत असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा तरुणाने काळे कापड दाखवून निषेध नोंदवला यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी अनेक वेळा आंदोलन केलं. सरकारने सांगितलं की समिती स्थापन करू पण याची एक सुद्धा बैठक घेण्यात आलेली नाही. उद्या सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. यानंतरचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील. नारायण राणे यांनी एक विधान दिले ते मला पटलेलं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

आत्महत्या करून आपल्याला मार्ग निघणार नाही. आपल्याला आई वडील खूप कष्टाने मोठे करतात तुमचे स्वप्न तुमच्या आई वडिलांचे देखील आहेत. आत्महत्या करून नाही. तर चर्चा करून प्रश्न सुटतील, असंही रोहित पवार म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.