दादासारखा नेता मुख्यमंत्री पदावर असावा, मुख्यमंत्री पदाबाबत रोहित पवार यांचं मोठं विधान काय?

धडाडीचा निर्णय घेऊ शकणारा मुख्यमंत्री असावा.

दादासारखा नेता मुख्यमंत्री पदावर असावा, मुख्यमंत्री पदाबाबत रोहित पवार यांचं मोठं विधान काय?
रोहित पवारImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 5:59 PM

बारामती : बारामतीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री ( Chief Minister) पदाबाबत मोठं विधान केलंय. दादांसारखा नेता अशा पदावर गेल्यास त्याचा फायदा राज्याला होईल, असं मत बारामतीचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, राष्ट्रवादीचा एखादा मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा होईल. राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) एकत्र लढतोय. उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास याचा अधिक फायदा सर्वांना होणार आहे. त्यासंदर्भात निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेत असतात. मोठे निर्णय झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार त्यांना स्वीकारतात. पण, असा नेता असावा की, जो स्वतः निर्णय घेऊ शकतो.

धडाडीचा निर्णय घेऊ शकणारा मुख्यमंत्री असावा. लोकांचं मत जाणून घेतलं पाहिजे. स्वतःचं मत असणारा नेता मुख्यमंत्री असावा, असंसुद्धा लोकांना वाटते, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

2024 ला नीलेश राणे, नीतेश राणे यांनी माझ्या मतदारसंघात यावं. कोण जिंकेल हे मी आता सांगणार नाही. हवेत आम्ही कधी बोलत नसतो. काम केलेलं आहे. काही लोकांना हवेत बोलण्याची सवय असते. 2024 चा बारामतीत कोणाला बोलवायचं असेल तर बोलवा. मग बघू. कोण जिंकणार, कोण जिंकणार नाही ते बघुया. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असंही रोहित पवार यांनी म्हंटलंय.

एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा करावा. तुम्ही करावा. व्यक्तिगत विषयासाठी, कौटुंबिक विषयासाठी कुणी कुठं जात असेल, तर त्याचं स्वागत आहे. धर्माचं राजकारण कोणी करू नये. याची काळी सर्वांनी घेतली पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.

भारत जोडोमध्ये पक्षामध्ये वेगळे लोकं येत आहेत. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने येतील. राज्यात आल्यानंतर कर्नाटकपेक्षा ही यात्रा मोठी होईल, असं आम्हाला वाटतं, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

बारामतीविरोधात बोलल्याशिवाय बातमी होत नाही. दादा, ताईंच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमी होत नाही. त्यामुळं बरेच जण बारामतीबाबत बोलत असतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.