Sachin Kharat vs Raj Thackeray : ‘कोण चांगलं कोण वाईट याचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार राज ठाकरेंना कुणी दिला?’
राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) (RPI) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. त्यांनी राज्य सरकारला याबाबत विनंती करत कारवाईची मागणी केली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. या राष्ट्रीय पुरुषांनी समाज जोडण्याचे काम केले. पण माननीय राज ठाकरे (Raj Thackeray) वारंवार हम करेसो कायद्याची भाषा बोलत आहेत. संविधानातील कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, याची जाणीव राज ठाकरेंना करून देणे गरजेचे आहे. त्यांच्या या बोलण्याने समाजातील एकीला तडा जाऊ शकतो. राज ठाकरे कोण वाईट आणि कोण चांगला याचे सर्टिफिकेट देत आहेत. हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला? त्यामुळे राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) (RPI) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. त्यांनी राज्य सरकारला याबाबत विनंती करत कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा?
प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते या व्यवस्थेला ‘राष्ट्रीय सुरक्षा’ असे म्हणतात. राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी, ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते. ही राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी सरकारला जो विशेषाधिकार प्राप्त होतो त्यालाच “राष्ट्रीय सुरक्षा कायदा” असे म्हणतात. आपल्या देशात राष्ट्रीय सुरक्षा कायदा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 23 सप्टेंबर 1980 साली अस्तित्त्वात आला. (What is national security act)
#Pune : राज ठाकरे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलीय. #RajThackeray #sachinkharat #NSA #Video अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/uya6nFPfbU
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2022
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. राज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.