रूपाली चाकणकर खडकवासल्यातून लढणार?; म्हणाल्या, महायुती म्हणून…

Rupali Chakankar on Khadakwasala Constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना खडकवासला मतदारसंघावर भाष्य केलं आहे. खडकवासला मतदारसंघातून लढण्याबाबत रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? वाचा सविस्तर बातमी....

रूपाली चाकणकर खडकवासल्यातून लढणार?; म्हणाल्या, महायुती म्हणून...
रूपाली चाकणकर, नेत्या राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 3:10 PM

राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर रूपाली चाकणकर यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. 2019 ला मी खडकवासला मतदारसंघाची मागणी केली होती. मी तिकडे काम करत होतेय आता महायुती म्हणून आम्ही ज्येष्ठ पदाधिकारी, अजितदादांकडे खडकवासला मागणी केली. पण महायुती म्हणून तो भाजपकडे आहे. आम्ही महायुती धर्म पाळू आणि काम करू, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

रूपाली चाकणकर यांनी काय म्हटलं?

बाहेरून आलेल्या लोकांना पक्षाचे ध्येय धोरणे माहित नसतात. अगोदर पक्षाचे ध्येयधोरणे समजून घ्यावे लागतात. त्याबद्दल जास्त न बोललेलं बरं… आपल्याला दिलेलं पद समाज आणि पक्ष याच्यासाठी करावा, ज्यांना आयोगाचा कार्यकाल माहिती नाही त्यांनी बोलू नये. विरोध कधी चांगले बोलत नाहीत. ते नेहमी टीका करतात. मी माझं काम करत आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

मी बचत गटापासून संघटनेचे काम करत आहे. महाराष्ट्राचे संघटना सांभाळले आहे. मला महाराष्ट्राची काम करण्यात आलं. महिला आयोगाचं पद हे संविधानिक पद आहे. पक्षाला सगळ माहिती होतं. मी लोकांच्या प्रश्नांसाठी काम करतेय. महिलांच्या प्रश्नांसाठी काम करतेय, असं चाकणकर म्हणाल्या.

महिला अत्याचारांच्या घटनांवर काय म्हणाल्या?

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याबाबत चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा चार्ज घेतल्यानंतर आज पोलीस आयुक्त इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बोपदेव घाट घटना आणि इतर घटनाबाबत घटना घडू नये, यासाठी काय करायला हवं. याबाबत सविस्तर चर्चा आयुक्तांनी केली. पुणे शहरातील २७४ हॉटस्पॉट काढले आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणीच्या ठिकाणी जातात ती ठिकाणी पोलिसांना माहिती असली पाहिजे. राज्य महिला आयोगाने एक पत्र दोन दिवसापूर्वी एक पत्र दिला आहे बदलापूर, उरण,कोपरखैरणे प्रकरण झाली. बाहेरच्या राज्यातील व्यक्तीचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असला पाहिजे, नवीन नागरिक राहायला येतात त्यावेळी त्यांची सर्व माहिती असली पाहिजे, असं चाकणकरांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.