Rupali Chakankar : ‘महिला आयोग आपल्या दारी’तून सुटणार महिलांच्या अडचणी, उपक्रम काय? रुपाली चाकणकरांनी सविस्तर सांगितलं

पोलिसांच्या सहकार्याने योग्य चौकशी करून पीडित महिलांना न्याय देण्याचे काम राज्य महिला आयोग (State women commission) करणार असल्याचे रुपाली चाकणकरांनी सांगितले आहे.

Rupali Chakankar : ‘महिला आयोग आपल्या दारी’तून सुटणार महिलांच्या अडचणी, उपक्रम काय? रुपाली चाकणकरांनी सविस्तर सांगितलं
रुपाली चाकणकर (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 5:01 PM

पुणे : राज्यातील विविध भागातील महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राज्यात महिलांच्या विविध अडचणी आता या उपक्रमाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत. या जनसुनावणीत 91 तक्रारी पुढे आल्या आहेत. आता या तक्रारींचा निपटारा महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातून महाराष्ट्र राज्य महिला आयोग करणार आहे. तर सायबर सेलकडे (Cyber cell) 25 हजार तक्रारी आलेल्या आहेत. यात एक हजार तक्रारी महिलांच्या आहेत. त्यामुळे त्यादृष्टीकोनातूनही पोलिसांच्या सहकार्याने योग्य चौकशी करून पीडित महिलांना न्याय देण्याचे काम राज्य महिला आयोग (State women commission) करणार असल्याचे रुपाली चाकणकरांनी सांगितले आहे.

सात दिवसांत मागितला श्रीकांत देशमुख प्रकरणाचा अहवाल

सोलापूर भाजपाचा बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख केसविषयीदेखील त्यांनी सांगितले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर 17 तारखेला गुन्हा नोंद केला गेला आहे. 18 तारखेला तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. सोलापूरला ती केस वर्ग केली आहे. तर सात दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

काय आहे श्रीकांत देशमुख प्रकरण?

श्रीकांत देशमुख हा सोलापूर भाजपाचा जिल्हाध्यक्ष होता. श्रीकांत देशमुख या माणसाने मला फसवले असून त्याच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. नाते नाकारून उलट माझ्यावरच हनी ट्रँपची खोटी केस दाखल केली, असा आरोप पीडित महिलेने 17 जुलैला केला होता. देशमुख यांनी आपल्यासोबत पुण्यातील डेक्कन भागातील एका हॉटेलमध्ये, मुंबईतील खेतवाडी भागातील एका हॉटेलमध्ये, सोलापूरमधील शासकीय विश्रामगृहात आणि सांगलीतील खासदार संजय पाटील यांच्या हॉटेलमध्ये वेळोवेळी शरीर संबंध ठेवल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे. माढ्याचे खासदार रणजीत निंबाळकर हे चित्रा वाघ यांच्याशी माझी भेट घडवून हे प्रकरण मिटवण्याच्या प्रयत्नात होते. पण मी ती ऑफर नाकारली. मला भाजपाकडून न्याय हवा आहे. श्रीकांत देशमुखला शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी मागणी पीडितेने केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.