Rupali Patil : मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला, याची चौकशी करणार आहात का? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारादेखील राज्य सरकारला रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

Rupali Patil : मोहित कंबोज कुठल्या आधारावर बोलला, याची चौकशी करणार आहात का? रुपाली पाटलांचा शिंदे-फडणवीसांना सवाल
भाजपावर टीका करताना रुपाली पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 5:01 PM

पुणे : मोहित कंबोज (Mohit Kamboj) हा परप्रांतीय असून तो आमच्या राज्यात येऊन सातत्याने विरोधकांना धमक्या देत आहे. पण आम्ही लक्ष देत नाही. कारण असे फालतू मोहित कंबोज वारंवार भुंकताना दिसत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनी केली आहे. मोहित कंबोज यांनी काल ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला तुरुंगात जाईल, असे विधान केले होते. त्यानंतर राज्यातले राजकारण (Politics) अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. त्याचवरून मोहित कंबोज यांच्यावर टीका करताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य सरकारलादेखील घेरले आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘सत्तेसाठी भाजपाचा पोरखेळ’

भाजपाचे नेत्यांनी हा जो पोरखेळ लावला आहे तो बंद करावा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारादेखील राज्य सरकारला रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. भाजपाचा कुठलाही नेता उठतो आणि म्हणतो, हा नेता आत जाणार, याच्यावर कारवाई होणार. याला कोणताही कायदेशीर थारा नाही. भाजपाच्या नेत्यांकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करून ज्याला क्लिनचीट दिली असेल, तुमच्या काळात दिली गेली असेल तरी पुन्हा चौकशी करायला लावणे हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ तुम्ही थांबवणार आहात का, असा सवाल त्यांनी भाजपाला केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे? ‘विरोधकांवर खोटे आरोप’

जेलमध्ये जायला कोणी घाबरत नाही. मात्र तुम्ही पारंपरिकतेला छेद देत आहात. विरोधकांवर खोटे आरोप करायचे. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर असे ट्विट सोडून विरोधकांना धाकात ठेवायचे, असा जो प्रकार मोहित कंबोज करत आहे, त्याला आमचा ठाम विरोध आहे. एखादा परप्रांतीय तो जेथून आला आहे, तेथे जाऊन या यंत्रणांचा गैरवापर करून सत्ता बदलावी, येथे का, असा संतप्त सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. तसेच ही मुस्कटदाबी सहन करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.