Rupali Patil : चित्राताई आता संजय राठोडांना राखी बांधायला जाणार, मंत्रिमंडळ विस्तारावरून रुपाली पाटलांचा हल्लाबोल; म्हणाल्या, तुमचा लढा खोटा…

चित्रा वाघ यांनी संजय राठोड आणि अन्य काही नेत्यांवर टीका केली होती. आता कुठे आहेत तुमचे आरोप, असा सवाल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना केला.

Rupali Patil : चित्राताई आता संजय राठोडांना राखी बांधायला जाणार, मंत्रिमंडळ विस्तारावरून रुपाली पाटलांचा हल्लाबोल; म्हणाल्या, तुमचा लढा खोटा...
चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना रुपाली पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 4:26 PM

अभिजीत पोते, पुणे : भाजपाच्या चित्रा वाघ (Chitra Wagh), देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैया ओरडून ओरडून सांगत होते, की संजय राठोड यांनी बलात्कार केला आहे. आता त्याच संजय राठोड (Sanjay Rathod) यांना भाजपाने पवित्र करून घेतले आहे. चित्राताई आता संजय राठोड यांना राखी बांधायला बंगल्यावर जाणार आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी केली आहे. त्या पुण्यात टीव्ही 9 सोबत बोलत होत्या. आता चित्रा वाघ म्हणत आहेत, की लढेंगे और जितेंगे… चित्राताई तुमचा लढा ही खोटा आणि तुम्ही आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही, असा हल्लाबोल त्यांनी चित्रा वाघ आणि भाजपावर केला आहे. तर ऑगस्ट क्रांतीदिनी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराची महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी नोंद असल्याची टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

‘घेऊन गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले’

बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. दोघांचा रखडलेला पाळणा आज अखेर हलला. असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपा केवळ महिला सन्मानाचा दिखावा करते. मात्र यानिमित्ताने भाजपा आणि शिंदे-फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला आहे. आज शपथविधी झालेल्या निम्म्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप याच भाजपाने केले होते. पण त्यांना भाजपामध्ये घेऊन गंगेमध्ये धुतले आणि पवित्र केले. आता त्यांना शपथ दिली. यावरून भाजपा सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे, हेच दिसून येते, अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रा वाघ यांच्यावर रुपाली पाटलांचा हल्लाबोल

‘कुठे आहेत तुमचे आरोप?’

महिलांचे शोषण करणारी लोक आहेत, भ्रष्टाचारी आहेत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राठोड आणि अन्य काही नेत्यांवर टीका केली होती. आता कुठे आहेत तुमचे आरोप, असा सवाल रुपाली पाटील यांनी चित्रा वाघ यांना केला. चित्रा वाघ, किरीट सोमैया अशा नेत्यांना भाजपा पुढे करून केवळ सत्तेची पोळी भाजत आहे. कुठे गेले चित्राताई तुमचे पुरावे, आता लढेंगे और जितेंगे, असे म्हणत आहेत. मात्र तुमचा लढाही खोटा आणि तुम्ही कधी जिंकूही शकत नाहीत, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.