Rupali Patil Thombre| राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात; पुण्याच्या रुपाली पाटील ठोंबरेचे नाव चर्चेत
चाकणकरांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक महिलांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरेही (Rupali Patil Thombre)या पदासाठी इच्छुक असल्याचे बोल जात आहे.
पुणे – राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Health President Rupali Chakankar) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party ) महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकरांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षातील अनेक महिलांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे. यात काही दिवसांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरेही (Rupali Patil Thombre)या पदासाठी इच्छुक असल्याचे बोल जात आहेत. याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
रुपाली चाकणकरांकडे महिला आयोगाची जबाबदारी
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता. एका व्यक्तीकडे दोन पदे असू नयेत, म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.
रुपाली यांनी चाकणकर यांप्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil व महिला प्रदेशाध्यक्ष @ChakankarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा निरिक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली होती. pic.twitter.com/GHVLK6DxfQ
— NCP (@NCPspeaks) March 23, 2022
आक्रमक व लढवय्या चेहरा पुण्यातील मनसेचा आक्रमक व लढवय्या चेहरा म्हणून रुपाली ठोंबरे ओळखल्या जायच्या. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. 2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. गर्भावस्थेतही घरोघरी फिरत प्रचार केल्याने त्या चर्चेचा विषय त ठरल्या होत्या. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी मनसेचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Man Jhala Bajind मालिकेत बगाड यात्रा; रायाला मिळाला बगाड्याचा मान