महामोर्चाला जाण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांची राज ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाल्या, राज्यपालांच्या विधानावर…

राज्यपालांच्या विधानानंतर भाजपने राज्यपालांना काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे. या सरकारचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही.

महामोर्चाला जाण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांची राज ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाल्या, राज्यपालांच्या विधानावर...
महामोर्चाला जाण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांची राज ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाल्या, राज्यपालांच्या विधानावर...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 11:16 AM

पुणे: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी पुण्यातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सकाळीच मुंबईच्या दिशेने निघाले. रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. राज्यपालांविरोधात भाजपने काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे, अशी टीका करतानाच मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांच्या विधानावर गप्प का बसले? असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा टोला रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

हे सुद्धा वाचा

आजचा मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला आहे. शिवाजी महाराजांविरोधात भाजप नेते सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत. त्याविरोधातील हा मोर्चा आहे. भाजपचंही आंदोलन होत आहे. लोकशाहीत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या मोर्चाची आणि आमच्या महामोर्चाची तुलना होऊच शकणार नाही. त्यांच्या मोर्चात काही अंध भक्त दिसतील, असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

मुख्यमंत्री साहेब तुम्ही कोणतं विकासाच राजकारण केलं? भाजपने एकनाथ शिंदेंना कुठल्या विकासासाठी फोडलं होतं? आपण गुहाटीला कुठल्या विकासासाठी गेला होता? फक्त सूडबुद्धीचे राजकारण हे लोक करतात आणि त्याचाच विरोध आजच्या महामोर्चातून करणार आहोत, असं त्या म्हणाल्या.

राज्यपाल बोलले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अळीमिळी गुपचिळी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांचा ग्रुप आपल्या स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून भाजपसोबत गेला, असा आरोप त्यांनी केला.

आमचा आजचा मोर्चा यशस्वी होत आहे म्हणून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही सगळे पक्ष पूर्ण ताकतीने आजच्या मोर्चा उतरत आहोत. सरकार सातत्याने कुरघोडीचं आणि तोडफोडीचं राजकारण करत आहे. आमच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असा दावा त्यांनी केला.

राज्यपालांच्या विधानानंतर भाजपने राज्यपालांना काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे. या सरकारचा बुरखा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.