Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे, अशी टीका आंदोलकांनी केली.

Sadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे..! रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन
रयत क्रांती संघटनेचे दौंडमधील कानगावात आंदोलनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 3:19 PM

पुणे : इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, अशी घोषणाबाजी रयत क्रांती संघटनेतर्फे (Rayat Kranti Sanghatana) करण्यात आली. पुण्यात आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील कानगाव येथेही हे आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता ताकवणे, संघटनेचे सरचिटणीस सयाजी मोरे, शेतकरी तसेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) असंतोष असून शेतकरीदेखील भरडला जात आहे. राज्यात केवळ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हिताचे काहीच होत नाही, असा आरोप करण्यात आला.

‘अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती’

गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकांचा, जनमताचा विश्वासघात करून स्थापन झालेले हे सरकार आहे. ते सरकार टिकवण्यासाठी संपूर्ण ताकद महाविकास आघाडी लावत असून त्यातच त्यांचा वेळ वाया जात आहे. आज तर राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. असा सगळा सावळा गोंधळ महाविकास आघाडी सरकारचा चालू असून यामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार ,लघुउद्योजक, विद्यार्थी भरडले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

‘राज्यातील जनता वैतागली’

मागील अडीच वर्षामध्ये अनेक आत्महत्या झाल्या, वादळे आली, महापूर आला, दुष्काळ आला. या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने कोणाकडेही लक्ष दिले नाही. त्यामुळे जनतेचे अतोनात हाल झाले, होत आहेत. त्यासोबतच राज्यातील जनता आता या भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारला वैतागलेली आहे. म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार जावो, म्हणजे इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, महाविकास आघाडी सरकारचे, लुटारूंचे राज्य जाऊ दे, असे फलक यावेळी आंदोलकांकडून लावत आणि घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. दौंडमधील कानगाव परिसरात आंदोलन करत ही घोषणाबाजी करण्यात आली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.