‘आंबे खाल्ल्यावर मुलं होतात छाप विधानं करणाऱ्यांनी संकटाच्या काळात दिशाभूल करु नये, अन्यथा….’

कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं | Sambhaji Bhide Jayant Patil

'आंबे खाल्ल्यावर मुलं होतात छाप विधानं करणाऱ्यांनी संकटाच्या काळात दिशाभूल करु नये, अन्यथा....'
जयंत पाटील आणि संभाजी भिडे
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 3:14 PM

सांगली: कोरोना संकट टाळण्यासाठी राज्य सरकार आणि समाज एकत्र मिळून प्रयत्न करत असताना दिशाभूल करणारी वक्तव्यं करणे अयोग्य आहे. अशा प्रकरणात तपासणी करुन आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी संभाजी भिडे यांना इशारा दिला. (NCP leader Jayant Patil slams Sambhaji Bhide over controversial statement about coronavirus)

ते रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत, असा रोखठोक इशारा दिला. सध्या अनेकांना कोरोनाची बाधी झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशाप्रकारची वक्तव्य करुन लोकांना वेगळ्या दिशेला नेणे अयोग्य आहे.

सध्या राज्य सरकार आणि समाज कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागलं तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच संभाजी भिडे पुन्हा अशाप्रकारचं धाडसी विधान करणार नाहीत, अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे: संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मास्कबाबत बोलताना शिवी हासडलीय. “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठं काय विकत बसलाय त्याला पोलीस लाठी मारतात. काय चावटपणा चाललाय? हा नालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही, माझ्यासारखी असंख्य लोक अस्वस्थ आहेत संपूर्ण देशात. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.

कोणत्या शहाण्याने मास्कचा सिद्धांत काढला?

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असंही संभाजी भिडे म्हणाले. (No need to wear a mask, it’s all nonsense said Sambhaji Bhide in Sangli Maharashtra)

हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असं ते म्हणाले. संबंधित बातम्या 

VIDEO : कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला? : संभाजी भिडे

VIDEO : कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, संभाजी भिडे पुन्हा घसरले

गाईचे तूप नाकात टाका किंवा गोमूत्र प्यायला द्या; कोरोना बरा होईल : संभाजी भिडे

(NCP leader Jayant Patil slams Sambhaji Bhide over controversial statement about coronavirus)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.