वटसावित्रीच्या पुजेवरून संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, महिलांनी नटीने…

Sambhaji Bhide Controversial Statement about Women : संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटींनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.वाचा सविस्तर...

वटसावित्रीच्या पुजेवरून संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, महिलांनी नटीने...
संभाजी भिडे, संस्थापक शिवप्रतिष्ठान Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 5:21 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायला येतं. वटवाघळाला येतं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. ह्या व्रताची पथ्य आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा 10 – 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

संभाजी भिडे यांनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं. संभाजी भिडे यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.

संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस

पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांचे धारकरी मानवंदना देणार आहेत. दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यावर शिव प्रतिष्ठानचे धारकरी मानवंदना देत असतात. यापूर्वी भिडे गुरुजी समर्थकांनी वारीत शस्त्र आणले होते. त्यावरून वाद झाला होता. यंदा पोलिसांनी आधीच त्यांना नोटीस पाठवली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.