सांगली पोलिसांची धडक कारवाई, 6 लाखांचा गुटखा पकडला
इस्लामपूर बायपास रस्त्यावर छापा टाकून तब्बल अडीच लाखांच्या अवैद्य गुटख्या सह सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. Sangali LCB seized 6 lakh rupees gutakha
सांगली : महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सांगलीत बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका गाडीवर कारवाई केली आहे. (Sangali LCB seized 6 lakh rupees gutakha case registered)
सांगली शहर आणि जिल्ह्यात अवैद्य गुटखाच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. इस्लामपूर बायपास रस्त्यावर छापा टाकून तब्बल अडीच लाखांच्या अवैद्य गुटख्या सह सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी आणि विक्री सुरू आहे. या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. आज शहरातल्या इस्लामपूर बायपास रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून एका गाडीतून तब्बल अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.
एका गॅरेज समोर ही गाडी लावण्यात आली होती. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून गाडीतील गुटखा जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये मालवाहतूक गाडीही जप्त करण्यात आलेली आहे. सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. ए. एस. सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
कोल्हापूर पोलिसांची कारवाई, 19 लाखांचा गुटखा पकडला
कोल्हूपरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 28 फेब्रुवारीला 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार (27 फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील उदगाव गावच्या हद्दीत हॉटेल क्रश समोरील रस्त्यावर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक रामचंद्र शामराव कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीररित्या टेम्पो मधून विविध कंपन्यांच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. बेळगावहून विमल कंपनीचा पान मसाला ,वर्ल्ड कंपनीची सुगंधी तंबाखू ,आर एम डी पानमसाला घेऊन जात असलेला टेम्पो पकडण्यात आला. गुटख्याची टेम्पोतून वाहतूक सुरु असताना ही कारवाई झाली.
(Sangali LCB seized 6 lakh rupees gutakha case registered)
हे ही वाचा :
कल्याणमध्ये चप्पलचं दुकान जळून खाक, 6 दिवसानंतर साफसफाई करताना लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ
गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या आवळल्या, पुण्यात येण्यास बंदी