सांगलीत अवकाळी पावसामुळे सावळज गावात द्राक्षाची बाग पडली, लाखो रुपयांचं नुकसान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा (Sangli Grapes Garden Destroyed) सह जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. सांगलीतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली (Sangli Grapes Garden Destroyed).
या मुसळधार अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील सावळज गावातील राहुल विष्णू माळी या शेतकऱ्यांची एक एकराची द्राक्ष बाग पडली आहे. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. या अवकाळी पासवामुळे हाता-तोंडाला आलेलं पीक बळीराजाच्या डोळ्यादेखत जमीन दोस्त झालं आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात द्राक्ष बागांचे लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. सावळजमध्ये तीन बागा पडल्या आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बाग कोसळली आहे. तर, अनेक ठिकाणी द्राक्ष पिकांवर या पावसामुळे परिणाम झाला आहे.
द्राक्षाचे मनी कुजण्याचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. सावळज मधील राहुल विष्णू माळी या शेतकऱ्याची द्राक्ष बाग कोसळली आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.
पुण्यातही पावसाचा इशारा
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल (Sangli Grapes Garden Destroyed).
शेतकऱ्यांनी नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
Pune Weather : पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यताhttps://t.co/goOaCcpevP#Pune #WeatherForecast #Weathercloud #WeatherAlert #maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021
Sangli Grapes Garden Destroyed
संबंधित बातम्या :
Weather Alert | परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी गाराही बरसल्या
Weather Update : राज्यात पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला