सांगलीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसे मैदानात, कन्नड भाषेतील फलकाविरोधात खळखट्याकचा इशारा

कर्नाटक राज्यात मराठी भाषेचा अपमान आणि गळचेपी होत असल्याने मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार रस्त्यावर आहे. MNS Kannada boards in Sangli

सांगलीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसे मैदानात, कन्नड भाषेतील फलकाविरोधात खळखट्याकचा इशारा
सांगली मनसे कन्नड फलकांविरोधात आक्रमक
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 12:15 PM

सांगली: कर्नाटक राज्यात मराठी भाषेचा अपमान आणि गळचेपी होत असल्याने मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार रस्त्यावर आहे. जिल्ह्यातील आस्थापनांवरील कन्नड भाषेतील बोर्ड फलक आठ दिवसात काढून टाकावे, अन्यथा ते फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने काढेल, असा इशारा मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांनी दिला आहे. (Sangli MNS leaders Tanaji Sawant warns to remove Kannada boards in Sangli)

कर्नाटक राज्याला सांगली जिल्ह्याची सीमा लागून आहे. कर्नाटक राज्यात अनेक मराठी भाषिक रहात आहेत. मराठी शाळा असून मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक आहेत. तेथील मराठी भाषिकांवर आणि मराठी भाषेवर तेथील सरकार दबाव टाकत आहे. कानडी सरकारकडूनत्यांची गळचेपी होत आहे. कर्नाटकातील काही जिल्ह्यात तेथील मराठी शाळा बंद केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एसटीवर उभे राहून कानडी लोक धिंगाणा घालत होते. त्यासोबत एसटीवर असलेल्या मराठीत असलेल्या नामफलकास काळे फासण्यात आले.ही बाब निंदनीय आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

कर्नाटकातील मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर अन्याय झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रा सह सीमाभागात कन्नड शाळा आहेत. त्या आम्हीही बंद करू सांगली भागातील कन्नड भाषाही बंद करू, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला. सरकार जरी झोपले असले तरी मनसे इथे मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरणार हे कन्नडगांनी विसरू नये, असा सज्जड दम तानाजी सावंत यांनी दिला. (Sangli MNS leaders Tanaji Sawant warns to remove Kannada boards in Sangli)

कानडी दमदाटी विरोधात मनसेने सांगली जिल्ह्यातील आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पिटलवर असलेले कन्नड व इतर भाषेतील बोर्ड फलक आठ दिवसात काढून टाकावे, असा इशारा दिला आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल ने काढेल याची खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूर गुलबर्गा बसवर कन्नडिगांचा उच्छाद

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगाव,निपाणी ,कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर पुणे येथे कर्नाटक बसवर लावल्यावर त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले होते. गुलबर्गा येथे गुलबर्गा सोलापूर बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. या कन्नड संघटनांनी गुलबर्गा ते सोलापूर बस वर लाल पिवळा ध्वज लावला तसेच बसच्या काचेवर काळी शाही फेकत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला.दरम्यान बेळगाव मध्ये काही संघटनांनी महाराष्ट्राच्या बसवर कानडी फलक लावला.

संबंधित बातम्या

Bharat Bandh | सांगलीत काँग्रेसकडून केंद्र सरकारचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”, सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

सांगलीत शिवसेनेचा धक्का, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भाजप नेत्यांना शिवबंधन

(Sangli MNS leaders Tanaji Sawant warns to remove Kannada boards in Sangli)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.