सांगली महापालिका सभेत राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी, महापौरांना ‘या’ मुद्यावर घेराव

महापालिका सभेत राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. Sangli BJP NCP

सांगली महापालिका सभेत राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी, महापौरांना 'या' मुद्यावर घेराव
सांगली महापालिकेत गोंधळ
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 4:34 PM

सांगली: महापालिका सभेत राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ऑनलाईन सभेसाठी रेंज नसल्याने भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना घेराव घातला. भाजप नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला. (Sangli Municipal Corporation BJP and NCP Corporators faceoff on online meeting network issue)

ऑनलाईन सभेसाठी रेंज नसल्याने महापौरांना घेराव

सांगली महापालिकेत सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. आज महापालिकेच्या विशेष सभेत राष्ट्रवादीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि महापौर पदाचे भाजपाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांच्यात सभागृहात वादाला सुरवात झाली. सभा ऑनलाईन असल्याने रेंज नसल्याच्या कारणावरून भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात जाऊन महापौरांना घेराव घातला. यावेळी सभेचे कामकाज विस्कळीत झाले.

भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी

सभा चालू असतानाच भाजपचे सर्व सदस्य सभागृहात आल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी भाजपा सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू असतानाच महापौरांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ,भाजप सदस्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्याने अखेर महापौर सभेचे कामकाज संपवून तिथून निघून गेले. यावेळी भाजपा सदस्यांनी महापौर पळाले अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. अनेक भाजपा नगरसेवकांना ऑनलाईन सभेच्या लिंक पाठवल्या नाहीत तर अनेकांनी रेंज नसल्याने हा संताप व्यक्त केल्याचं भाजप नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी सांगितलं. भाजपच्या हातातून सत्ता गेल्याचा संतापही आजच्या घोषणाबाजीत पाहायला मिळाला.

शासनाच्या निर्देशानुसार सभेचे कामकाज ऑनलाईन सुरू असताना भाजपाच्या सदस्यांनी रेंज नाही,लिंक नाही असा आरोप करीत सभागृहात येत सभेच्या कामकाजात व्यत्यय आणला. ही कृती योग्य नसल्याचं महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

Bharat Bandh : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ वेळेत रिक्षा सेवा राहणार बंद

(Sangli Municipal Corporation BJP and NCP Corporators faceoff on online meeting network issue)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.