सांगली झेडपीत असे काय घडले? सगळे मेंबर अधिकाऱ्यावर धावले?
सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज (शुक्रवार) मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांच्या अंगावर एकाच वेळी तब्बल 60 सदस्य धावून गेले. गुडेवार यांच्या मनमानी कारभाराविरोधातील आंदोलनावेळी सदर प्रकार घडला. (Sangli Zilla Parishad general meeting Political Rada)
जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेवेळी गुडेवार यांच्याविरोधात सर्वपक्षीय सदस्यांनी आंदोलन केलं. यावेळी बाचाबाची होऊन सर्वपक्षीय 60 सदस्य गुडेवार यांच्या अंगावर धावून गेले.

Sangali ZP Rada 2
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी जिल्हा परिषद बरखास्तीची मागणी केली होती. त्यांच्या ही मागणी योग्य नसून ते मनमानी कारभार करत आहेत. अशा अधिकाऱ्याला कामावरुन कमी करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी जिल्हा परिषदेच्या पायरीवर बसून अधिकारी हटाव ही मागणी करण्यात आली.
यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी अधिकारी हटावची मागणी केल्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला. त्यानंतर बाचाबाची होऊन अधिकाऱ्याच्या अंगावार सर्वपक्षीय सदस्य धावून गेले. (Sangli Zilla Parishad general meeting Political Rada)
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या
ग्रामपंचायत निकालात ट्विस्ट, आधी विजयाचा गुलाल उधळला, प्रमाणपत्रावर भलताच निकाल
राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले